Shiv Sena UBT MP Sanjay Jadhav addressing a public meeting while launching a scathing verbal attack on Congress leader Babajani Durani during district-level election campaigning. Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav On Babajani Durani : अरे 17 वर्ष आमदार राहिला अन् स्वीकृत नगरसेवक झालास... 'चुल्लूभर पाणी मे डुब मरो' : ठाकरेंचा खासदार बाबाजानींवर घसरला!

Babajani Durani controversy : संजय जाधव यांनी प्रचारसभेत काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्यावर जोरदार टीका करत स्वीकृत सदस्य पद स्वीकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भाजप-काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत सगळ्यांनी आपापल्या घरातील उमेदवार दिलेत. वरपडूकरांच्या घरातले चार आणि एक लेक असे पाच जण निवडणूक लढवतायेत. आमदार राजेश विटेकर यांनी दोन भाऊ उभे केलेत, बोर्डीकरांचेही आहेच. हे सगळं आपल्याच घरात ओरबडून नेत आहेत, अशा शब्दात खासदार संजय जाधव यांनी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी सतरा वर्ष आमदार होते, त्यांनी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य व्हावं, यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कोणती? चुल्लूभर पाणी मे डुब मरो, असा टोलाही जाधव यांनी लगावला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना संजय जाधव यांनी भाजपसह विरोधकांवर टीका केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य पद स्वीकारले, यावरून जाधव यांनी त्यांना चांगलेच सुनावले.

दोनवेळा विधान परिषद आणि एकदा विधानसभा अशी सतरा वर्ष आमदार राहिलेल्या माणसाने नगरपालिकेत स्वीकृत सदस्य व्हावं का? तुम्हाला पोरगं निवडून आणता आलं नाही. मग तुम्हीच स्वीकृत सदस्य झाला. एवढी हाव कशाला पाहिजे? एखाद्या गरीबाच्या पोराला संधी दिली असती तर त्याने आयुष्यभर तुमचं नाव घेतलं असतं, असा हल्लाबोल जाधव यांनी दुर्राणी यांच्यावर केला.

भाजपा हा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांचा पक्ष झाला आहे, असा आरोप करत संजय जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त भाजपा घोषणेचीही खिल्ली उडवली. मुळ भाजप आता राहिलीच कुठे, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही आमचे लोक भाजपमध्ये घेऊन याचा पक्ष चालायला. यांच्याकडे माणसंच राहिली नाहीत.

परभणी जिल्हा परिषदेत पैसे देऊन उमेदवार मिळत नसल्याने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अपक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे 17 जिल्हा परिषद गट आणि 34 गणांचे फाॅर्म दिले. उमेदवार तुमचे पण चिन्ह आमचं कमळ अशी यांची अवस्था झाल्याचे सांगत जाधव यांनी भाजपची खिल्ली उडवली. कुठे एक खासदार कमी असताना पंतप्रधान पद आणि सत्ता सोडणारे अटलबिहारी वाजपेयी आणि कुठे आजचा भाजप पक्ष? असा टोलाही त्यांनी लगावला.

पाच वर्ष जर माझ्या हातात परभणीची सत्ता आली असती तर सगळ्यांना घाम फोडला असता, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीत येणाऱ्या प्रत्येक पक्षाकडून पैसे घ्या, शेवटी ते त्यांनी बरासी खोदून आणलेले नाहीत. तुमचाच लुटलेला तो पैसा आहे, पण मतदान मात्र योग्य उमेदवारालाच करा, असे आवाहनही संजय जाधव यांनी केले. माझ्यावर ठाकरे कुटुंब आणि मला पाच वेळा निवडून देणाऱ्या जनतेचे उपकार आहेत, जे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT