

Sanjay Jadhav latest speech against Babajani Durrani : परभणी महापालिकेत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत युती केली आणि आम्ही सत्ता मिळवली. अशीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दिसली असती, परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या मनात आघाडी करण्याची इच्छाच नव्हती. त्यांच्या हेकेखोरपणामुळेच जिल्हा परिषदेला आघाडी होऊ शकली नाही, अशी तोफ शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी डागली.
परभणी जिल्हा परिषदेचा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यात सगळेच पक्ष स्वतंत्र तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण अशा पद्धतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली.
महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली. परिणामी महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकला.
जिल्हा परिषदेसाठी मात्र या दोन पक्षांची आघाडी होऊ शकली नाही. यावरून आता खासदार संजय जाधव यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना जबाबदार ठरवले आहे.
बाबाजानी दुर्राणी यांची शिवसेनेसोबत आघाडी करण्याची सुरुवातीपासूनच इच्छा नव्हती. आमची मात्र महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेलाही काँग्रेस सोबत आघाडी व्हावी, अशी इच्छा होती. आम्ही तसे प्रयत्नही केले. परंतु काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या हेकेखोर भूमिकेमुळे आमची आघाडी होऊ शकली नाही.
ती झाली असती तर जिल्हा परिषदेमध्येही आम्ही भाजपला पूर्ण ताकदीने रोखण्यात यशस्वी झालो असतो. आताही आम्ही स्वबळावर भाजपला रोखूच. परंतु काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असता तर ही लढाई अधिक सोपी गेली असती.
परभणी महापालिकेत बाबाजानी दुर्राणी यांना आम्ही हस्तक्षेप करू दिला नाही, म्हणून किमान आमची काँग्रेस सोबत स्थानिक नेत्यांमुळे आघाडी होऊ शकली आणि आम्ही बहुमतासह सत्ता आणली.
तिथे बाबाजानी दुर्राणी यांनी हस्तक्षेप केला असता तर कदाचित आमची आघाडी होऊ शकली नसती, अशा शब्दांत खासदार संजय जाधव यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेस सोबत आघाडी न होण्याला जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी हेच जबाबदार असल्याचे निक्षून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.