Sanjay Jadhav’s first reaction to the cashew-almond controversy sarkarnama
मराठवाडा

Sanjay Jadhav : दुष्काळी आढावा बैठकीत काजू-बदामावर ताव, खासदार संजय जाधवांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले, 'समोर ताट वाढल्यावर...'

Drought Review Meeting : ‘समोर ताट वाढल्यावर खाणं चुकीचं आहे का? विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नाही.', अशी अरेरावीची भाषा खासदार संजय जाधव यांनी केली.

Roshan More

Sanjay Jadhav News : नांदेडमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान खासदार संजय जाधव काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरून विरोधकांकडून टीका होत असताना खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘समोर ताट वाढल्यावर खाणं चुकीचं आहे का? विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नाही.', अशी अरेरावीची भाषा त्यांनी केली.

याच्यावर माझी प्रतिक्रिया असल्याचे कारण नाही. आम्ही बैठकीला आलो कोणी ठेवले, काय ठेवले, पण कोणी तुमच्यासमोर ताट वाढून ठेवल्यानंतर तुम्ही घेणार की नाही घेणार? तुम्ही सांगा, असा उलट प्रश्न जाधव यांनी पत्रकारांना केला.तसेच काजू बदाम बैठकीत ठेवणाऱ्याची चूक आहे, ठेवायला नको होतं, असे देखील ते म्हणाले.

या बैठकीचं निमंत्रण विरोधकांना देखील होते मात्र ते आले नाहीत, त्यांना बोलायचे असल्याने ते काही बोलू शकतात, असे देखील त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

प्रशासन बैठकांमध्ये ड्रायफूट आणून ठेवते, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. पण जाणीवपूर्वक दुष्काळ आहे म्हणून असं कोणीतरी करते, हे म्हणणे योग्य नाही. पण प्रशासनाने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि संवेदनशीलपणे वागले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

विरोधकांची टीका

आमदार अंबादास दानवे म्हणाले की,यांना संवेदनशीला आहे की नाही? शेतकऱ्यांच्या बैठक जेथे होत आहे त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. बैठकांच्या नाटकांची गरज नाही, सरळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे. तर, सुषमा अंधारे यांनी देखील बैठकांचा फार्स कशासाठी असे म्हणत टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT