Sanjay jadahv  Sarakarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha Constituency : पांडुरंग हरी... संजय जाधव निकालापूर्वी विठुरायाच्या दर्शनाला..

Lok Sabha Election Counting Shivsena Candidate from Parbhani Took Darshan of Lord Vitthal : परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बाॅस नावाने ओळखल्या जाणाऱ्या संजय जाधव यांचा खरा बाॅस हा पंढरपूरातील पांडुरंगच आहे.

Jagdish Pansare

Parbhani News : शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे मावळते खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे वारकरी म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. पंढरपूरच्या विठ्ठलावर त्यांची असलेली निस्सीम भक्ती पाहून त्यांचे कौतुक वाटते.

राजकारणात राहूनही त्यांनी आपल्या भक्तीमध्ये कधी अंतर येऊ दिले नाही. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बाॅस नावाने ओळखल्या जाणाऱ्या संजय जाधव यांचा खरा बाॅस हा पंढरपूरातील पांडुरंगच आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर असतांना जाधव यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. परभणी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या विजयाच्या दिशेने निघालेल्या जाधव यांना विठ्ठलाचा कृपा प्रसाद मिळतो का? हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.

तत्पुर्वी पंढरपुरात संजय जाधव (Sanjay Jadahv ) यांनी पांडुरंगाचे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले. सावळ्या विठुरायाचे मनोहरी रुप पाहून भारावलेल्या जाधव यांनी भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Parbhani Lok Sabha Constituency news)

"अजि म्यां पुन्हा ब्रम्ह पाहिले.." सावळ्या, मनोहर ब्रम्हांडनायकाचे, माझ्या विठूमाऊलीचे 700 वर्षांपूर्वी सारख्या नवीन बांधल्या गेलेल्या सुंदर, अवर्णनीय गाभाऱ्यात दर्शन घेतले. ज्ञानोबा-तुकोबांच्या काळात गेल्यासारखे वाटले! दिंड्या पताकांचा कल्लोळ उठला. जुन्या काळाच्या त्या पवित्र स्मृती हुबेहूब साकार झाल्यात. कटेवर हात ठेवून श्री विठ्ठल-रुक्मिणी सोन्याचांदीच्या त्या पत्र्यांच्या कैदेतून बाहेर पडले.

संतपरंपरेचा तो सुवर्णकाळ पंढरपुरात पुन्हा जिवंत झाला आहे. संत समाजभूषण, वै. मारोती महाराज दस्तापूरकर यांचे दर्शन घेतले. आज मन तृप्त झाले. सृष्टीचा जनिता पांडुरंग हृदयातून जाता जात नाही. तो सुंदर गाभारा आणि माझी विठूमाऊली असंख्य भाविकांना अवीट तृप्ती देत आहेत. जय हरी, असे म्हणत जाधव यांनी समाधान, आनंद व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी केलेली ही पंढरपूरची वारी फळाला येणार का? याकडे सगळ्यांचे लागले आहे. परभणीत महायुतीचे (Mahayuti) महादेव जानकरविरुद्ध (Mahdev Jankar) महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात चुरस आहे. मतमोजणी आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये संजय जाधव विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT