Hemant Godse Vs Rajabhau Waje News : नाशिक लोकसभा मतदार संघाचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे.उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणीच्या तयारीत व्यस्त आहेत. तर बहुतांश उमेदवारांनी देवाचा धावा करीत थेट तीर्थस्थळांना भेटी घेत विजयासाठी देवाकडे साकडं घालणे सुरू केले आहे. तर उमेदवारांच्या समर्थकांनी सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी सातला सुरू होत आहे. निकालासाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आहे. निकालाबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड हूरहूर आहे. त्यामुळे उमेदवार अक्षरशः देवाचा धावा करीत आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी विविध तीर्थस्थळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे.
सोमवारी त्यांनी तुळजापूर आणि जेजुरीला जाऊन पूजा केली. तर दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी देखील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. शिर्डी,अजमेर शरीफ, पुष्कर तसेच भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. नस्तनपुर येथील शनी मंदिरात त्यांनी विजयासाठी साकडे घातले.
खासदार गोडसे यांच्या समर्थकांना त्यांच्या विजयाची मोठी खात्री आहे. त्यामुळे त्यांनी गोडसे यांच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मतदारसंघात 135 ठिकाणी खासदार गोडसे यांच्या विजयानिमित्त अभिनंदनाचे फलक लावण्याची तयारी केली आहे.
या फलकांची डिझाईन देखील तयार करण्यात आलेली आहे. मतमोजणीच्या आदल्या दिवशी सोमवारी दिवसभर खासदार गोडसे यांचे समर्थक, मतमोजणी प्रतिनिधी मतदारसंघातील मतदानाचा आढावा घेत विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उत्सवाची तयारी करीत होते.
उमेदवारांच्या समर्थकांना निवडणुकीत निकाल नक्की कोणाच्या बाजुने लागतो याबाबत मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे शिवसेने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे वाजे यांच्या समर्थकांनी देखील विजयाची तयारी सुरु केली आहे. एक्झिट पोलमध्ये खासदार गोडसे पाठीमागे राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाही गोडसे यांच्या समर्थकांनी विजयाची जोरदार तयारी केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.