Saanjay Raut |Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Thackeray-Shinde Politics: संजय राऊत कलयुगातील शकुनीमामा; शिरसाटांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो

Sanjay Shirsat Replied to Sanjay Raut : खासदार संजय राऊत हा कालियुगातील शकुनी मामा आणि आता उद्धव ठाकरे धृतराष्ट्र झाले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, आमच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करता, आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून संजय राऊत (Sanjay Raut) यांना पोटशूळ उठलाय, म्हणून ते आम्हाला रावण रामाला भेटायला गेल्याचं म्हणाले, असा टोलाही शिससाट यांनी लगावला आहे. (Sanjay Raut is Shakunimama of Kalyuga and Uddhav Thackeray is Dhritarashtra; Shirsat's Reply)

संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राम आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्मण करतील. ते धमक्या आल्या म्हणतात ,लोक मारतील म्हणून यांना सुरक्षा हवीये. संजय राऊत टिनपाट आहे, त्याला काय गांभीर्याने घ्यायचे, असेही शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच, आमच्यात कुठलीही फूट नाही. सगळे आमदार अयोध्येला आले होते. काही कामानिमित्त एक 2 आले नसतील. संजय राऊत काम नसल्याने टीका करतोय, असा टोलाही शिरसाटांनी लगावला आहे.

त्याचवेळी ठाकरे गटाचे नेचे अंबादास दानवे यांनी अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या मंत्र्यांना गुंड म्हण टिका केली होती. या टिकेलाही शिरसाटांनी उत्तर दिलं आहे. अंबादास यांना काम नाही लोकांचे पाहावे वाकून इतकेच उद्योग त्यांना आहेत. तसेच जो गुन्हेगार असेल तर कायदा काम करेल यांनी ताण घेऊ नये, असही शिरसाटांनी म्हटलं आहे. शरद पवार दाऊदच्या विमानात बसले होते असे ते म्हणतात, मग पवार गुन्हेगार झाले का, असा सवालही शिरसाटांनी विचारला आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयात आज वकील आशिष गिरी यांनी शिवसेना भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावरही शिरसाटांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ''आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे, शिवसेना भवन मंदिर आहे, आम्हाला त्यांनी घडवलं आहे. आम्हाला भवन आणि संपत्ती नको, कुणी याचिका दाखल केली असेन तर याचिका आणि आमचा संबंध नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. याचिका आणि आमचा संबंध नाही. आमचा त्या वकीलाशी संबंध नाही, हे पाप आम्ही करणार नाही. असंही त्यांनी स्पष्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT