BJP News: भाजपशी एकनिष्ठ राहायचे अन्‌ कमळाचाच प्रचार करायचा : मंदिरात दिली शपथ; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा

Case Registered Against BJP Leaders: ज्येष्ठ नेत्यांनी सर्व तिकीट इच्छुकांना सोमेश्वर मंदिरात बोलावून पक्षाचा प्रचार करण्याची शपथ दिली. मात्र, त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : भारतीय जनता पक्षाशी (BJP) एकनिष्ठ राहण्याची आणि कमळाचाच प्रचार करण्याची शपथ घेण्यासाठी भाजन नेत्यांनी गदग येथील ऐतिहासिक मंदिरात बैठकीत घेतली. मात्र, धार्मिक स्थळांच्या गैरवापरावरून या भाजप नेत्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. यामुळे भाजपचे दोन आमदार (MLA), गदग-बेटगेरी नगरपरिषदेचे अध्यक्ष, विधानसभेचे तिकीट इच्छुक अडचणीत सापडले आहेत. (Oath taken in temple to be loyal to BJP; Case registered against BJP leaders)

भाजपचे आमदार प्रदीप शेट्टर, शिरहट्टीचे आमदार रामण्णा लमाणी, बीबीएमसीच्या अध्यक्षा उषा दासर, डॉ. चंद्रू लमाणी, गुरुनाथ दानप्पानावर, भीमसिंग राठोड यांनी ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरात नुकतीच बैठक घेतली आहे. त्या बैठकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर, धार्मिक स्थळांच्या गैरवापरावरून या नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी लक्ष्मेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

BJP
Konkan News : शिष्टाचार न पाळल्याने केंद्रीय मंत्र्यांनी कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रम केला रद्द

शिरहट्टीमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रामण्णा लमाणी यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अन्य नेत्यांना तिकीट देण्याची विनंती प्रदेश नेत्यांना केली आहे. या आवाहनानंतरही रामण्णा यांनी त्यांना तिकीट दिले, तर दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घडामोडीचा भाजपच्या निवडणूक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नेत्यांनी सर्व तिकीट इच्छुकांना सोमेश्वर मंदिरात बोलावून पक्षाचा प्रचार करण्याची शपथ दिली. मात्र, त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

BJP
BJP-Congress Dispute News : हॉर्न वाजविण्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले : तुफान दगडफेक, सहा जखमी, १२० जणांवर गुन्हे

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मंदिराचा गैरवापर करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आमचे सर्व नेते सोमेश्वराचे भक्त आहेत. मंदिराच्या आवारात नवस घेतला आहे. त्यामुळे नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, आम्ही देशाच्या कायद्याचा आदर करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com