Cm Eknath Shinde News, Aurangabad
Cm Eknath Shinde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : मुख्यमंत्र्यांसाठी शिरसाट-भुमरे दोघांच्या गाड्या, पण...

सरकारनामा ब्युरो

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. दुपारी चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले तेव्हा स्वागतासाठी शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळाच्या लाॅबीमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट या दोघांनी नव्या कोऱ्या चकचकीत गाड्या उभ्या केल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच गाडीत बसावे अशी दोघांचीही इच्छा होती. (Shivsena) पण विमानतळातून बाहेर येताच एकनाथ शिंदे थेट पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या गाडीत जावून बसले आणि शिरसाटांनी (Sanjay Shirsat) आणलेली गाडी स्थानिक पदाधिकाऱ्यांना घेवून त्यांच्या पाठोपाठ निघाली. म्हणायला ही साधी घटना, पण राजकीय वर्तुळात याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

शिंदेंच्या बंडात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक असलेल्या संजय शिरसाट यांना डावलले जात आहे का? असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थीत केला जात आहे. राज्यातील सत्तांतर आणि त्यात एकनाथ शिंदे यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद यामुळे शिरसाटांच्या मंत्रीपदाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण एकाच जिल्ह्यात तीन मंत्री नको, अशी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका आणि पक्षातीलच संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्याशी करावी लागलेली स्पर्धा यात शिरसाट मागे पडले.

पहिल्या मंत्रीमंडळात भुमरे, सत्तारांची वर्णी लागली. दोघेही कॅबिनेट मंत्री झाले, पण शिरसाटांना काही संधी मिळाली नाही. शिवाय संभाव्य मंत्रीमंडळ विस्तार देखील लांबतच चालला आहे. मुख्यमंत्र्यांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी, यासाठी शिरसाट सातत्याने प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांसाठी शिरसाटांनी विमानतळावर गाडी उभी केली होती.

त्यांच्याच शेजारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील आपली गाडी मुख्यमंत्र्यांसाठी उभी केली होती. पण स्वागताचा स्वीकार करत विमानतळातून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी भुमरेंच्या गाडीत बसत आपला पुढचा प्रवास केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा निघाल्यानंतर दुसऱ्या गाडीत मग शिरसाट आणि स्थानिक पदाधिकारी त्यांच्यापाठोपाठ गेले. शिरसाटांच्या गाडीत बसणे मुख्यमंत्र्यांनी टाळले, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT