Sanjay Shirsat On Ncp News  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Ncp News : राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष, ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत...

Maharashtra : अजित पवार भाजप सोबत आले तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, राष्ट्रवादीसोबत जायचे नाही.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र ठरले तरी सरकारला धोका नाही, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची यापुर्वी दिल्लीत आणि काल मुंबईत गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्या घडामोडींकडे शिंदे गट कसं पाहतो? याबद्दल उत्सूकता निर्माण झालेली आहे.

आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावर भाष्य केले असून राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष आहे, ते सत्तेशिवाय राहूच शकत नाही. अजित पवार हे पुर्वीपासूनच (Bjp) भाजपसोबत जाण्यास इच्छूक होते, तसा प्रयोग त्यांनी केला देखील होता. त्यामुळे (Sharad Pawar) शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बैठकीत आमच्या कुटुंबावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव सांगितले आणि कुटंबातील सदस्याने जर तसा निर्णय घेतला तर तो त्याचा व्यक्तिगत असेल.

राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. हा सगळा बनाव आहे, मुळात राष्ट्रवादी काॅंग्रेसला सत्ता गेल्यामुळे आता (Uddhav Thackeray) ठाकरे किंवा काॅंग्रेस सोबत राहण्यात रस राहिलेला नाही. ईडीची भिती राष्ट्रवादीतील अनिल देशमुख, जेलमध्ये असलेले नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना नाही का? अजित पवारांनाच ईडीची भिती कशी वाटते? हे सगळं नाटक वरिष्ठ नेत्यांच्या आशिर्वादाने सुरू आहे.

त्यामुळे अजित पवार १५-२० आमदार घेवून भाजपसोबत गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सत्तेत सहभागी न होता ते बाहेरून पाठिंबा देतील, असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला. अजित पवार भाजप सोबत आले तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, राष्ट्रवादीसोबत जायचे नाही, म्हणून आम्ही उठाव केला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोब जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT