Ashok Chavan News : आता अशोक चव्हाण वज्रमुठ सभेत गैरहजर राहणार..

Congress : आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे. सभेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Ashok Chavan News, Maharashtra
Ashok Chavan News, MaharashtraSarkarnama

Maharashtra : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि देशपातळीवर मोदी सरकारच्या विरोधात मोठी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यात (Mahavias Aghadi)महाविकास आघाडीतील तीन्ही घटक पक्षाने संयुक्त सभा घेण्याची घोषणा केली होती. त्याची सुरूवात छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेने झाली होती. परंतु राज्यातील पहिल्याच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहिले होते.

Ashok Chavan News, Maharashtra
Dhnanjay Munde News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता , पण साधा बायपास रस्ता करता आला नाही..

त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. पंरतु आपली प्रकृती आणि घसा ठणठणीत आहे, पण राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत महत्वाची बैठक असल्याने आपण दिल्लीला जात असल्याचा खुलासा पटोले यांनी केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या विदर्भातील नागपूरात होणाऱ्या आजच्या सभेत काॅंग्रसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गैरहजर राहणार आहेत.

अशोक चव्हाण यांनी स्वतः ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. (Congress) चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे. सभेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत सगळं काही `आॅल इज वेल नाही`, अशी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले यांनी दांडी मारली होती, तर आता नागपूरातल्या सभेला अशोक चव्हाण जाणार नाहीयेत. यामुळे पटोले-चव्हाण यांच्यातील बेबनावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com