Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : 'हमारा नाम बहोत चल रहा है, एखादी बॅग पाठवून देतो' शिरसाटांचा काॅन्फीडंस कशामुळे वाढला?

Sanjay Shirsat says "Hamara naam bahot chal raha hai" in a witty response regarding the money bag issue. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय सारखे महत्वाचे खाते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्याने संजय शिरसाट यांची खऱ्या अर्थाने स्वप्नपुर्ती झाली.

Jagdish Pansare

Shivsena News : 'हमारा नाम बहोत चल रहा है, पैशाची चिंता करू नका, एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देतो' हे बोल आहेत राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट याचे. बेडरुममधील अर्धनग्न अवस्थेत सिगारेटचे झुरके मारत फोनवर बोलणारे मंत्री महोदय, शेजारी पैशाने भरलेली सुटकेस हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांची राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या दाव्यानूसार त्यांचे नाव सध्या खूप चालतयं पण ते अभिमानाने सांगावे या कारणामुळे तर निश्चितच नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय सारखे महत्वाचे खाते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्याने संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची खऱ्या अर्थाने स्वप्नपुर्ती झाली. मंत्रीपद मिळाल्यानंतर नाही त्यापेक्षी किती तरी अधिक पटीने पालकमंत्री झाल्यावर त्यांचा थाट वाढला. पण सत्ता, मंत्री पदासोबत त्यांचे विरोधकही वाढले. अर्थात शिरसाट यांनी चुका केल्या आणि त्याचा पुरेपूर फायदा विरोधकांनी उचलला. वीस हजार स्क्वेअर फूटावर राज महलासारखा बंगला, त्यासमोर कोट्यावधी रुपयांच्या अलिशान गाड्यांच्या रांगा यावरून सर्वप्रथम संजय शिरसाट हे टीकेचे धनी ठरले.

विरोधक, पक्षातंर्गत आणि मित्र पक्षातील काही हितचिंतकांनी संजय शिरसाट यांचा 'करेक्ट कार्यक्रम' लावण्याची तयारी सुरू केली. (Shivsena) पुरावे हाती लागल्यानंतर एकएक प्रकरण बाहेर निघू लागली. हाॅटेल व्हिट्स खरेदी, एमआयडीसीतील आरक्षित प्लाॅट, सरकारी वर्ग दोनची जमीन, शहरालगत पंधरा एक जमीन, शहरात मोक्याच्या जागेवर प्लाॅट या प्रकरणांनी उचल खाल्ली आणि शिरसाट गोत्यात आले. बेडरूम मधील पैशाच्या बॅगेसोबतच्या व्हायरल व्हिडिओने शिरसाट यांच्या अडचणीत अधिक भर घातली.

परंतु हा व्हिडिओ बनावट आहे असे सांगत संजय शिरसाट यांनी तो व्हायरल करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली. मुंबईच्या पावसाळी अधिवेशनात हाॅटेल व्हिट्स प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी लावल्यानंतर तणावत असेल्या शिरसाट लगेच सारवरले. पण व्हिडिओ तो ही बेडरूम मधला व्हायरल झाल्याने 'घर का भेदी कोण'? याचेच टेन्शन त्यांना अधिक आल्याचे दिसून आले. विरोधकांवर त्यांनी पलटवार करत सगळे आरोप फेटाळले.

एवढेच नाही तर जाहीर कार्यक्रमातून ज्या नोटांच्या बॅगवरून त्यांना लक्ष केले जात आहे, तशा बॅगचा उल्लेख ते आपल्या भाषणातून करू लागले आहे. एकूण काय तर शिरसाट यांनी मला अशा आरोपींनी काही फरक पडत नाही, असे दाखवण्याचा यातून प्रयत्न केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नव्या डिजिटल मेमोग्राफी यंत्र व स्तन कर्करोग तपासणी उपकरणाच्या शुभारंभ प्रसंगी शिरसाट हे रिलॅक्स दिसले.

भाषणात त्यांनी आरोग्य सेवा आणि रुग्णांसाठी पैशाची कमी पडू देणार नाही, तुम्ही काहीही मागा ते लगेच दिले जाईल, असे सांगताना हमारा नाम बहोत चल रहा है, एखादी बॅग पाठवून देतो, अशी मिश्किल टिप्पणी केली. शिरसाट यांच्या देहबोलीवरून त्यांनी विरोधकांचे आरोप फारसे मनावर घेतले नाही, असेच दाखवण्याचा प्रयत्न केला. आता खरंच त्यांना विरोधकांचे आरोप 'हर फिकर को मै धुअँ मे उडाता चला गया' म्हणायचंय का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सगळ्या बाजूने घेरले गेलेले, एकाकी पडलेल्या संजय शिरसाट यांना एवढा आत्मविश्वास आला कुठून? असाही सवाल केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT