Maharashtra Assembly Election 2024 : भोकरदन तालुक्याचे आमदार व महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे यांनी शनिवारी रात्री उशिरा आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार दानवे यांच्यासोबत भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची संतोष दानवे (Santosh Danve) यांनी घेतलेली भेट यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असल्या तरी ही भेट राजकीय नसून फक्त सदिच्छा भेट असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी `सरकारनामा`शी बोलताना स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला व त्यांच्या पराभवाचे कनेक्शन जरांगे पाटलांशी जोडण्याचे कटकारस्थान विरोधक व महाविकास आघाडीतील नेते करत असले तरी प्रत्यक्षात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे राजकीय पार्श्वभूमी नसलेले व मराठा समाजासाठी गेल्या वर्षभरापासून लढणारे सेवक आहेत.
विरोधक मनोज जरांगे यांचे नाव वापरून जनतेला कन्फ्युज करण्याचे काम करत आहे. मनोज जरांगे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही तसेच त्यांची भूमिका देखील त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वच लोक राजकीय पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत म्हणून जरांगे यांची भेट घेतली आहे.
या भेटीकडे फक्त सदिच्छा भेट या दृष्टिकोनातून बघावे, असे आवाहन आमदार संतोष दानवे यांनी केले. मनोज जरांगे यांच्याशी माझी सामाजिक विषयांवर चर्चा झाली. शिवाय मनोज जरांगे हे अनेक वर्षापासून आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. सर्वसामान्य गरीब मराठ्यांविषयी त्यांनी सुरुवातीपासूनच आंदोलन केले व करत आहेत.
यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देखील मिळाला. विरोधक आमच्या भेटीचे राजकारण करू शकतात किंवा या भेटीच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम पसरवू शकतात. जनता हुशार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कन्फ्युज करणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल, असं मला विश्वास आहे, असेही संतोष दानवे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.