Accused Jayaram Chate released from jail in the Santosh Deshmukh murder case. sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगाबाहेर, पोलिस बंदोबस्तात गावाकडे रवाना

Santosh Deshmukh Case Jayaram Chate Walks Out of Jail : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा कोर्टाच्या परवानगीने तुरुंगाबाहेर आला आहे. तो आज आपल्या गावी गेला आहे.

Roshan More

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा तब्बल 14 महिन्यानंतर तुरंगाबाहेर आला आहे. त्याच्या भावाचे निधन झाले होते. त्याच्या 12 व्याचा विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी त्याने कोर्टाकडे मागितली होती. कोर्टाने द्याला परवानगी दिली होती. त्यानंतर तो आज त्याच्या मूळ तांबवा या गावी भावाच्या 12 व्याचा विधीसाठी उपस्थित राहिला.

आज सकाळी पोलिस बंदोबस्तामध्ये जयराम चाटे हा कारागृहाबाहेर पडला. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिने जयरामच्यासोबत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. कोर्टाने त्याला विधीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी चार या वेळेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

चाटे याने भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी विशेष न्यायालयात परवानगी मागितली होती. त्याला सरकारी वकीलांनी विरोध केला होता. चाटे हा तुरुंगाबाहेर आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणतील वाल्मिक कराड याच्यासह सुदर्शन घुले, विष्णू चाटे ,जयराम चाटे,महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले हे आरोपी आहेत.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील चाटे याला कारागृहाबाहेर सोडण्यास विरोध केला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे की आरोपी कसे वागले आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. आरोपीला बाहेर सोडल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उज्वल निकम यांनी सांगितले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT