Santosh Deshmukh Case  Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT नंतर आता CIDचे अधिकारीही बदलले; काय आहे कारण

latest update Santosh Deshmukh murder investigation new: देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे आल्यानंतर सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांच्याकडे हे प्रकरण होते. पण अनिल गुजर हे सीआयटीमध्ये पोलिस निरीक्षक आहेत,

Mangesh Mahale

Beed News 17 jan 2025: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ रोपींना मोक्का लागला आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. आरोपींवर मोक्का लागल्यानंतर आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचे अधिकारी यापूर्वी बदलण्यात आले होते.

सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे आल्यानंतर सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांच्याकडे हे प्रकरण होते. पण अनिल गुजर हे सीआयडीमध्ये पोलिस निरीक्षक आहेत, मोक्का लावलेल्या प्रकरणाचा तपास हा डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असतो. त्यामुळे गुजर यांना या तपासातून हटविण्यात आले आहे.

अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. ते अपर पोलिस अधीक्षक आहेत. वाल्मिक कराडच्या नावावर अमेरिकेत नोंद असणारं सीम कार्ड सापडलं आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

"हा आका जो आहे तो सोपा आका नाहीये. तो 17-17 मोबाईल वापरत होता. तुम्ही ही नवीनच योजना मला सांगितली. तो करत असेल अमेरिकेवरील नंबरवरुन धमक्या वगैरे! आका काय काय नाही करु शकत? तो 50-50 लोकांना काही ठराविक रक्कम पाठवत होता," असे सुरेश धस म्हणाले.

देशमुख हत्या तपासाला वेग आला असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर'बंगल्यावर भेट घेतली. देशमुख हत्या प्रकरणाचे वकीलपत्र घेण्याबाबत निकम-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

देशमुख हत्येच्या तपासात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यामुळे हा खटला चालवण्यासाठी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्तींची घोषणा लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT