Santosh Deshmukh Murder Case:संतोष देशमुख हत्येच्या तपासात उज्ज्वल निकमांची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

Ujjwal Nikam likely Appointed Government Lawyer Santosh Deshmukh Case: देशमुख हत्येच्या तपासात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
Ujjwal Nikam
Ujjwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Beed News 17 jan 2025: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास सीआयडी आणि एसआयटी करीत आहेत. देशमुख हत्या तपासाला वेग आला असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, अशी मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर'बंगल्यावर भेट घेतली. देशमुख हत्या प्रकरणाचे वकीलपत्र घेण्याबाबत निकम-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

देशमुख हत्येच्या तपासात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

हा खटला चालवण्यासाठी निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्तींची घोषणा लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची घोषणा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. काल (गुरुवारी) विष्णू चाटे याला लातूरच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

Ujjwal Nikam
Kalyan Marathi Youth Assault: मराठी तरुणावर परप्रांतीयांचा हल्ला ; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला 'हा' आदेश

वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात अॅमनोरा सिटीमध्ये त्याचे मध्ये दोन फ्लॅट आहेत. ज्योती जाधव यांच्या नावाने हे फ्लॅट खरेदी करण्यात आले आहेत. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचे समजते. एक फ्लॅट हा शरद मुंडे याच्या नावे तर दुसरा फ्लॅट हा ज्योती जाधव यांच्या नावे आहे.

वाल्मिक कराडच्या नावावर अमेरिकेत नोंद असणारं सीम कार्ड सापडलं आहे, असा आरोप धस यांनी केला आहे. "हा आका जो आहे तो सोपा आका नाहीये. तो 17-17 मोबाईल वापरत होता. तुम्ही ही नवीनच योजना मला सांगितली. तो करत असेल अमेरिकेवरील नंबरवरुन धमक्या वगैरे! आका काय काय नाही करु शकत? तो 50-50 लोकांना काही ठराविक रक्कम पाठवत होता," असे सुरेश धस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com