Ujjawal Nikam Santosh Deshmukh Walmik Karad .jpg Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयाचा वाल्मिक कराडला दणका; आरोपींनी केलेली मोठी मागणी फेटाळली

Beed Court News: बीडच्या विशेष न्यायालयात मंगळवारी (ता.23 मार्च) संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेन ड्राइव्ह मधून देण्यात आले. तर आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

Jagdish Pansare

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी काही आरोपींनी वकीलांमार्फत विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती रद्द करा, अशी मागणी करण्यात आली, परंतु न्यायालयाने ती फेटाळली. दरम्यान, गेल्या वेळच्या सुनावणी आरोपींच्या वकिलांनी मागितलेल्या लॅपटाॅपमधील अतिरिक्त पुराव्याचे पेन ड्राईव्ह त्यांना देण्यात आले.

याशिवाय आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावे अशी मागणी न्यायालयाकडे केली. परंतु, सदरील व्हिडीओ ई -साक्ष या शासकीय अॅपवर अपलोड असल्यानं ते देऊ शकत नसल्याचं सरकारी पक्षानं सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी सात एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, सुनावणीसाठी आलेले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मला आणि माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या फोन नंबरवरून धमक्या येत आहेत. ही केस कशी थांबवता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा मोठा दावा केला.

बीडच्या विशेष न्यायालयात मंगळवारी (ता.23 मार्च) संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेन ड्राइव्ह मधून देण्यात आले. तर आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली. परंतु, हे व्हिडिओ ई -साक्ष या शासकीय अॅपवर अपलोड असल्याने देऊ शकत नसल्याचे सरकारी पक्षाने सांगीतले.

तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी, असा अर्ज मुख्य आरोपींपैकी 3 ते 7 जणांकडून करण्यात आला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला आहे. तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडकडून आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात बाजू मांडण्यासाठी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT