

Satara, 24 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला राड्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदान न करू देता झालेल्या अटकेमुळे सातारा पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका होत आहे. त्यावर सातारा पोलिसांनी देसाई, मांडवे यांना अटक का करावी लागली, तसेच झालेला राडा याचा सविस्तर अहवाल सातारा जिल्हा प्रशासनाने एसआयटीला सादर केला आहे. त्यात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट पोलिसांनी केले आहेत.
एसआयटीला दिलेल्या अहवालात सातारा (Satara) पोलिसांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यात सर्वांत महत्वाचा दावा हा अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्याबाबत केला आहे. या दोघांना मतदान करू न देता अटक का करण्यात आली, याचीही सविस्तर माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत पराभव होणार, याची खात्री वाटू लागल्यामुळे देसाई आणि मांडवे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया उधळून लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे या दोन सदस्यांना अटक करावी लागली, असे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
सातारा पोलिसांनी अहवालात म्हटले आहे की, अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे दोघे चौथ्या मजल्यावर गेल्यावर आमच्या नेत्यांना आडवता का, असे पोलिसांना म्हणाले. या सर्व गोष्टीला सदस्य बापू शिंदे हेच जबाबदार आहेत, त्यांनीच आमच्याविरुद्ध मुलाला तक्रार द्यायला लावली, त्यामुळे आम्ही बापू शिंदेला सोडणार नाही, असा इशारा देत होते. त्यावेळी पोलिसांनी देसाई आणि मांडवे यांना बाजूला घेऊन तुम्ही मतदान करा. कोणताही अनुचूचित प्रकार करू नये, अशी विनंती केली. मात्र, ते दोघे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
पोलिस हे देसाई आणि मांडवे यांना शांततेत मतदान करा, असे समजावून सांगत असताना पोलिस त्या दोघांना अटक करून घेऊन जात आहेत, अस समज मंत्री शंभूराज देसाई यांचा झाला. त्यामुळे ते त्या दोघांच्या हाताला धरून ओढून नेऊ लागले. त्यावेळी या दोन्ही सदस्यांना सभागृहात जाऊ दिले असते तर गंभीर प्रकार घडला असता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्पुरते ताब्यात घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या मुद्यावर आक्रमक हेाते, असा दावा सातारा पोलिसांनी केला आहे.
बापू शिंदे आपल्याला मतदान करेल की नाही, याची ग्यारंटी नाही. त्यानेच आपला गेम केला आहे. त्यामुळे त्याला जिवंत सोडणार नाही. कामेश कांबळे यानेही आपल्याला धोका दिला आहे, त्यामुळे निवडणूक झाली नाही तरी चालेल पण बापू शिंदेला सोडणार नाही, अशी देसाई आणि मांडवे यांनी दिली. हे दोघेही अरेरावी आणि दमबाजीची भाषा बोलू लागल्यामुळेच या दोघांना अटक करावी लागली, असेही सातारा पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.