Devendra Fadnavis, Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Desmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सीआयडीला आदेश; फरार आरोपींची संपत्ती जप्त करा

CM orders CID investigation : आरोपीच्या अटकेची मागणी केली जात असतानाच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

Sachin Waghmare

Beed News: बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला 19 दिवस उलटले आहेत. तरीही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपीच्या अटकेची मागणी केली जात असतानाच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले.

दरम्यान शनिवारी बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.

यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगितलेले होते. आता येत्या काळात जर धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) पालकमंत्री पद दिले तर छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेणार आहे. बीडचा बिहार करायचा का? आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.

19 दिवस झाले आरोपी सापडत नाहीत. तीन आरोपी सापडत नाही, आणि त्यांच्या म्होरक्या बिनधास्त पोस्ट टाकतोय की मी दर्शनाला गेलोय. मुख्यमंत्री तुम्ही कसं चालवून घेताय. तुम्ही एसआयटी लावणार होतात. हा म्होरक्या खंडणीत दोषी असल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग अजून अटक का झाली नाही? असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT