Santosh Deshmukh Murder : आव्हाडांच्या आरोपाला शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा दुजोरा; ‘तो आयएएस अधिकारी अजूनही गायब...’

Sanjay Gaikwad-Jitendra Awhad Statement : आपल्या बुलडाणा जिल्ह्यात 942 बंदुकींचे लायसन्स आहे. एकट्या बीडमध्ये साडेबारशेच्या आसपास बंदुकीची लायसन्स आहेत. खुलेआमपणे लोक तिकडं बंदुका चालवतात.
Sanjay Gaikwad-Jitendra Awhad
Sanjay Gaikwad-Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Beed, 28 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी बीडमध्ये आज सर्वपक्षीय शांतता मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘बीडमधील एका आयएएस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत’ असा दावा केला होता. त्याला सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दुजोरा देत बीडमधील गुन्हेगारीवर नेमके बोट ठेवले आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, बीडमध्ये कुचे नावाचे कोणी कलेक्टर होते का? त्या कुचे यांनी एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मी जेव्हा बीडला कलेक्टर होतो, तेव्हा चोवीस तासांत एकदा तरी मारामारी व्हायची. दोन दिवसांतून एकदा तरी खून व्हायचा.

कुचे नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांत धक्कादायक सांगितलं की, एका आयएएस अधिकाऱ्याची बदली झाली. त्यानंतर तो अधिकारी गायब झाला, तेव्हापासून तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्र सरकारच्या दफ्तरी त्याची नोंदच नाही, हे किती धक्कादायक आहे, असा सवालही आमदार आव्हाड यांनी केला.

Sanjay Gaikwad-Jitendra Awhad
Prajakta Mali Vs Suresh Dhas : ‘मी प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही’ म्हणत सुरेश धसांनी ‘त्या’ प्रेस कॉन्फरन्सवरच संशय घेतला

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा देणारे व्यक्तव्य केले आहे. ते म्हणाले, वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. विशेष म्हणजे त्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी आपल्या एका भाषणात केला होता. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे, त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही. कराड हा त्यांचा डावा कि उजवा हात आहे, असेही सांगितले आहे, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले होते.

Sanjay Gaikwad-Jitendra Awhad
Suresh Dhas : पंकूताई...आमची स्वाभिमानी औलाद, तुमच्यापुढं जी हुजूर करणार नाही; सुरेश धस यांचे मुंडेंना चॅलेंज (Video)

वाल्मिक कराड हा खंडणीखोर आहे. आपल्या बुलडाणा जिल्ह्यात 942 बंदुकींचे लायसन्स आहे. एकट्या बीडमध्ये साडेबारशेच्या आसपास बंदुकीची लायसन्स आहेत. खुलेआमपणे लोक तिकडं बंदुका चालवतात. सन 1992 मध्ये एक आयएएस अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झालेला आहे.अजून तो सापडलेला नाही. असे प्रचंड गुन्हेगारीचे स्वरूप त्या बीड जिल्ह्यात आहे. त्यावर कोणाचेच कंट्रोल नाही, असा दावाही संजय गायकवाड यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com