Dhananjay Munde - Karuna Sharma Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case: करुणा शर्मा यांचे भाकीत खरे ठरले! धनंजय मुंडे राजीनाम्याच्या तयारीत?

Santosh Deshmukh Murder Case karuna sharma prediction true:आरोपींना फाशींची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. मी मुंडे यांना कॅाल करुन त्यांना राजीनामा द्या, असे सांगणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Mangesh Mahale

Mumbai News: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. असा आदेश फडणवीस यांनी मुंडे यांना दिला असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. मुंडे काही वेळातच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतल्याचे समजते.

करुणा शर्मा मुंडे यांचा शब्द खरा ठरला! धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी समाज माध्यमांवर मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाकीत केले होते. ते आता खरे ठरणार आहे.आरोपींना फाशींची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. मी मुंडे यांना कॅाल करुन त्यांना राजीनामा द्या, असे सांगणार आहे, असे त्या म्हणाल्या. मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी साम टीव्हीशी सांगितले .

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

करुणा मुंडे यांनी फेसबूक पोस्ट केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवासापूर्वी मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची आपल्याला माहिती आहे, असे ठोसपणे करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होते. ३ मार्च रोजी राजी नामा होगा, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टनंतर आता मुंडे राजीनामा देणार की नाही, याबाबतच उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव आले आहे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होते आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं की, जरी वाल्मिक कराड दोषी निघाला, तर मी स्वतः राजीनामा देणार.. आता त्यांच्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागेल, असे करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT