Santosh Deshmukh Murder Case: भावाच्या क्रुर हत्येचा पहिला फोटो पाहिल्यानंतर धनंजय देशमुखांनी टाहो फोडला! जरांगेंच्या गळ्यात पडून रडले

माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील, मला आता वेदना सहन होत नाहीत. फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक गावकऱ्यांच्या गळ्यात पडून रडावं असं वाटतंय. नियती आरोपींना माफ करणार नाही.
Dhananjay Deshmukh
Dhananjay DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भीषण फोटो समोर आले असून हे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला आहे. देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी क्रुरेतेचा कळस गाठला आहे. हे फोटो पाहून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सकाळी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले.

माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील, मला आता वेदना सहन होत नाहीत. फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक गावकऱ्यांच्या गळ्यात पडून रडावं असं वाटतंय. नियती आरोपींना माफ करणार नाही. फोटो पाहिल्यावर मला वेदना झाल्या. मला लहानपणींचे फोटो आठवले. भावाच्या हत्येचा एकच फोटो पाहून दुसरे फोटो पाहण्याची माझी हिमंत झाली नाही, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

Dhananjay Deshmukh
Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार पीडितीनं वसंत मोरेंना सांगितली आपबिती; म्हणाली, तात्या मला वाचवा!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीननामा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले आहे, याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

या घटनेचे फोटो सोमवारी रात्री समाजा माध्यमावर व्हायरल झाले. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर फडणवीस यांनी आज सकाळी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, असा दबाब विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी यांनी मुंडे यांना लाथ मारून बाहेर काढावं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. फडणवीस, अजित पवार तसेच प्रफुल पटेल यांची देवगिरीवर महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये शेवटी राजीनामा द्यावाच लागेल, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com