Special Public Prosecutor Ujjwal Nikam during the MCOCA court hearing in the Santosh Deshmukh murder case, as the court examines a plea filed by the accused. Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh case : उज्वल निकम यांचं भाजप कनेक्शन संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडथळा ठरणार? आरोपींनी केलेल्या 'त्या' मागणीमुळे सुनावणीत नवा पेच

Santosh Deshmukh Murder Case Update : आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली. त्यावेळी सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी युक्तिवाद केला. या सुनावणीसाठी संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित होते.

Jagdish Patil

Beed News, 19 Dec : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीत आता नवा पेच निर्माण झाला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद करणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्याची मागणी आरोपी सुदर्शन आणि प्रतीक घुले यांनी मकोका न्यायलयाकडे केली आहे.

त्यांच्या या मागणीवर अद्याप कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, वकील उज्वल निकम यांनी हा अर्ज फेटाळत बाद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीत नवीन पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.

आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली. त्यावेळी सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी युक्तिवाद केला. या सुनावणीसाठी संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित होते. वाल्मीक कराडसह इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

या हत्या प्रकरणी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद सुरू केला. त्यानंतर सुदर्शन आणि प्रतीक घुले यांनी सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याचा सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करत त्यांना या केसमधून बाजूला करावे, असा अर्ज मकोका न्यायालयाला दिल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, निकम यांनी आरोपींचा दावा फेटाळात अर्ज बाद करण्याची मागणी न्यायलयाकडे केली आहे. तर न्यायालयाने याबाबतचा आदेश राखूव ठेवला आहे. मात्र, आरोपींच्या मागणीमुळे आता उज्वल निकम हे सध्या भाजपमध्ये असल्यामुळे ही केस त्यांच्याकडून काढून घेतली जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

उज्वल निकम यांनी मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. चाटेचे सुरवातीच्या दोन एफआयआरमध्ये नाव नसून त्यांच्यावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

मात्र, सरकारी पक्षाच्या वकिलांनी विष्णु चाटेने सतत आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केल्याचा युक्तीवाद केला, शिवाय विष्णु चाटे सुरूवातीपासून गुन्ह्यात सक्रिय असल्याचंही सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता न्यायालय चाटेच्या जामिनावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT