Vishnu Chate | Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case: विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी CIDची दमछाक; सरपंच देशमुख हत्येच्या तपासासाठी...

Beed News Santosh Deshmukh Murder Investigation: विष्णू चाटे याच्या फोनवरुन वाल्मिक कराड याने खंडणीची धमकी दिली होती, त्यामुळे हा मोबाईल सापडणे, पोलिसांना तपासासाठी महत्वाचे आहे.

Mangesh Mahale

Beed Murder Case Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांना मोक्का लावला आहे. यातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला शोधण्यासाठी सीआयडीची पथक तपास करीत आहेत. या तपासाची सगळी सूत्रं एका मोबाईलभोवती फिरत आहेत.

अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक आरोपीचे पाच मोबाईल जप्त केले आहे, पण आरोपी विष्णू चाटे याने फेकून दिलेला मोबाईल सीआयडीला सापडत नसल्याने हत्या प्रकरणाच्या तपासाला अपेक्षित वेग आलेला दिसत नाही.

नाशिकमध्ये विष्णू चाटे याने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. या प्रकरणाशी संबधीत खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेला वाल्मिक कराड याला या फोनवरुन विष्णू चाटे याने संपर्क केला होता. चाटे याने हा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिला, पण तो कुठे फेकला हे त्याला सांगता येत नाही. त्यामुळे सीआयडी या फोनचा शोध घेत आहेत.

चाटे याच्या फोनवरुन खंडणीची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे हा मोबाईल सापडणे, पोलिसांना तपासासाठी महत्वाचे आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वाल्मिकने विष्णू चाटेच्या फोनवरुन 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती, याची व्हायरस झालेली ऑडियो क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विष्णू चाटे हा फरार होता. तो नाशिकमध्ये असताना त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. त्याला उद्या (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला शोधण्यासाठी सीआयडीचे पथक राज्याच्या बाहेर गेले आहे. आंधळे 9 डिसेंबर 2024पासून मोकाटच आहे.

देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांना मोका लावण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. तो अद्याप फरार कसा, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आंदोलनाता पवित्रा घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT