
Delhi Elections 2025 Candidate List: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. यात 5 अनुसूचित जमातीतील महिलांचा समावेश आहे. 29 जणांच्या दुसऱ्या यादीत तीन अनसुचित व्यक्तींना तिकीट दिले आहे.
आता भाजपच्या 12 जागांवर उमेदवार घोषित होणे बाकी आहे. शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत उमेदवाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
करावल नगर विधानसभेसाठी कपिल मिश्रा, मोती नगरमधून हरीश खुराना, कोंडलीमधून प्रियंका गौतम यांना तिकीट दिले आहे. प्रियंका गौतम यांनी आम आदमी पक्षातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने निवडणुक लढण्याची संधी दिली आहे.
भाजपने 4 जानेवारी रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 29 जणांनी नावे होती, यात आप आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 7 जणांना तिकीट देण्यात आले. पहिल्या यादी विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले. तर 13 जणांना पुन्हा तिकीट दिले आहे. तर 16 ठिकाणी उमेदवार बदलले आहेत.
गांधीनगरमध्ये विद्यमान आमदार अनिल बाजपेई यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अरविंद सिंह लवली यांना तिकीट दिले आहे. नवी दिल्ली येथून आपचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात प्रवेश वर्मा निवडणुक लढत आहेत. तर काँग्रेसने अलका लांबा यांना मैदानात उतरवलं आहे.
नरेला :राज करण खत्री
तिमारपुर: सूर्य प्रकास खत्री
मुंडका : गजेंद्र दराल
किराड़ी: बजरंग शुक्ला
सुल्तानपुर माजरा (अजा): कर्म सिंह कर्मा
शकूर बस्ती :करनैल सिंह
त्रिनगर: तिलक राम गुप्ता
सदर बाजार :मनोज कुमार जिंदल
चांदनी चौक : सतीश जैन
मटिया महल: दीप्ति इंदौरा
बल्लीमारान :कमल बागड़ी
मोती नगर: हरीश खुराना
मादीपुर (अजा): उर्मिला कैलाश गंगवाल
हरी नगर: श्याम शर्मा
तिलक नगर: श्वेता सैनी
विकासपुरी: पंकज कुमार सिंह
उत्तम नगर :पवन शर्मा
द्वारका: प्रदयुम्न राजपूत
मटियाला: संदीप सहरावत
नजफगढ़: नीलम पहलवान
पालम : कुलदीप सोलंकी
राजिंदर नगर : उमंग बजाज
कस्तुरबा नगर : नीरज बसोया
तुगलकाबाद : रोहतास बिधूड़ी
ओखला : मनीष चौधरी
कोंडली (अजा): प्रियंका गौतम
लक्ष्मीनगर: अभय वर्मा
सीलमपुर : अनिल गौड़
करावल नगर : कपिल मिश्रा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.