Sanjay Shirsat-Walmik Karad-Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder : संजय शिरसाटांचे मोठे विधान; ‘दोन दिवस वाट पाहा, वाल्मिक कराड किंवा आणखी कोणी...? तोही यातून वाचणार नाही’

Sanjay Shirsat Statement : वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, खुनाचा ३०२ गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल लोकांच्या मनात आहे. पण तपासाचा भाग म्हणून देशमुख कुटुंबीयांनी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी.

Vijaykumar Dudhale

Beed, 13 January : संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडला वाचवलं जातंय, असा अनेक लोकांच्या मनात संशय आहे. कराडवर खुंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पण खुनाचा गुन्हा का नाही असा सवाल विचारला जात नाही. पण एक-दोन दिवस वाट पाहा. कोणालाही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे, त्यामुळे वाल्मिक कराड असेल किंवा आणखी कराडचा कोणी असेल, तर तो यातून वाचणार नाही, असा इशारा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिला.

वाल्मिक कराडवर खुनाचा आणि मोकाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोग येथे आंदोलन केले, त्यावेळी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हा इशारा दिला आहे.

शिरसाट म्हणाले, संतोष देशमुख यांच्या मुलीने केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. काहीही चुकीचं नाही. तिचे वडील गेले आहेत, तिच्या त्या भावना आहेत. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा जो तपास सुरू आहे, त्याची माहिती आम्हाला देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. तिनं आवर्जून सांगितलं की, आम्ही चॅनेलच्या माध्यमातून पाहतोय की ह्याला अटक झाली, त्याला अटक झाली. खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला विश्वासात घेणं गरजेचंसुद्धा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कडक पावले उचलली आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानुसार आरोपींना अटकही झालेली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरारी आहे, त्यालाही लवकरच अटक होईल. पण माझी विनंती आहे की सरकार देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. ही जी घटना घडलेली आहे, ती कोणत्याही सर्वसामान्य माणसापासून कोणालाही दुःख देणारी आहे किंवा कोणालाही पचनी पडलेले नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

संजय शिरसाट म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणातून वाल्मिक कराडला वाचवलं जातंय, असा अनेक लोकांच्या मनात संशय आहे. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, खुनाचा ३०२ गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल लोकांच्या मनात आहे. पण तपासाचा भाग म्हणून देशमुख कुटुंबीयांनी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी. या प्रकरणातील दोषी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मग तो वाल्मिक कराड असेल किंवा कराडचा आणखी कोणी असेल, तर तो त्यातून वाचणार नाही, हे लक्षात घ्या.

महायुतीचे हे सरकार देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करेल. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना विनंती आहे की, तुमच्या भावनेशी सर्वजण सहमत आहोत, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT