Santosh Deshmukh Murder Case : पोलिसांचा टॉवरला बंदोबस्त; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Dhananjay Deshmukh's Agitation : धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत, त्यामुळे सर्व गाव पाण्याच्या टाकीकडे लोटला आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली येत नाहीत.
Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Beed, 13 January : मस्साजोगचे सरपंच (स्व) संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज सकाळपासून गायब झाले होते. धनंजय यांनी आज टॉवरवरून उडी मारून आत्मदहन करण्याचा इशारा रविवारी दिला होता. त्यामुळे बीड पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या शेजारी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे धनंजय देशमुख हे सकाळपासूनच गायब झाले होते.

दरम्यान, धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत, त्यामुळे सर्व गाव पाण्याच्या टाकीकडे लोटला आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली येत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी मोबाईलरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधत त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसही घटनास्थळी पोचले असून ते धनंजय देशमुख यांना खाली येण्याची विनंती करत आहेत. आंदोलकांनी पाण्याच्या टाकीची शिडी काढून ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांना वर जाता येत नाही. जोपर्यंत वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा धनंजय देशमुख हे वारंवार देत आहेत.

Dhananjay Deshmukh
BJP Politics : CM फडणवीसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात युद्ध छेडलं अन् किरीट सोमय्या 'अ‍ॅक्शन मोड'वर...

मस्साजोगचे सर्व ग्रामस्थही पाण्याच्या टाकीच्या शेजारी गोळा झाले आहेत. जोपर्यंत वाल्मिक कराडवर खुनाचा आणि मोकाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्हीही टाकीच्या शेजारी ठाण मांडून राहणार असल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. धनंजय देशमुख यांच्यासह दोन ते तीन तरुणही पाण्याच्या टाकीवर वरच्या बाजूला आहेत.

दरम्यान, धनंजय देशमुख आणि मस्सोजागचे ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत. पाण्याच्या टाकीची वर जाणारी शिडी काढून ठेवल्यामुळे पोलिस प्रशासनही हतबल झाले आहेत. घटनास्थळी मनोज जरांगे पाटील आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. हे सर्व धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती करत आहेत. मात्र, वाल्मिक करावडवर मोका लावावा आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा, यावर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ ठाम आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com