CM Devendra Fadanvis-Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Winter Assembly Session : आरोपी 'बाप तो बाप रहेगा'चे पोस्टर झळकावतायेत, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?

Sarpanch murder case to be investigated by CID-SIT will also be formed, Fadnavis' information : परंतु एखाद्या मंत्र्याचा विनाकारण या प्रकरणाशी संबंध जोडणे, त्याचा सभागृहात उल्लेख करणे योग्य नाही. हे सगळं महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांपर्यंत पोहचत असले.

Jagdish Pansare

नागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे पडसाद आज (Winter Assembly Session) विधीमंडळ अधिवशेनाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधान परिषदेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप असलेल्या आरोपींच्या समर्थनाथ थेट पोलीस स्टेशन समोरच 'बाप तो बाप रहेगा', असे पोस्टर झळकवत होते. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे? असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष आणि याच पक्षाच्या एका मंत्र्यांच्या जवळच्या माणसाचे नाव या प्रकरणात समोर येत आहे, असा आरोप करत दानवे यांनी थेट वाल्मिक कराड यांचे नावच सभागृहात घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फरार आरोपींना तात्काळ अटक करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, कोणत्या जातीचे आहेत हे न बघता त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे प्रकरण सरकारने गांभीर्यानेच घेतले आहे, घटना घडली तेव्हा चार्ज असलेल्या पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. अजून जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

तपास सीआयडीकडे, एसआयटीही स्थापन करणार

परंतु एखाद्या मंत्र्याचा विनाकारण या प्रकरणाशी संबंध जोडणे, त्याचा सभागृहात उल्लेख करणे योग्य नाही. हे सगळं महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांपर्यंत पोहचत असले. त्यामुळे एखाद्या मंत्र्याबद्दल संशय किंवा त्यांचे नाव जोडणे हे योग्य ठरणार नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाच्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या कारवाई होणारच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

तसेच हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे, त्यांना एसआयटी स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. या शिवाय एआय तंत्राचा वापर करत आधुनिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास सरकार करत आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार तपास करत आहे. तीन आरोपी अटकेत आहेत, इतर आरोपींचा शोध सुरू आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT