Vaibhavi Deshmukh, Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh : फोन ठेवताच पप्पा खूप घाबरलेले...; हत्येच्या आदल्या दिवशी आलेला 'तो' फोन कुणाचा? संतोष देशमुख नेमकं काय बोलले? वैभवीने जबाबात सांगितलं

Vaibhavi Deshmukh statement : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून देशमुख यांच्याशी संबंधित लोकांसह कुटुंबियांचा जबाब घेत आहेत. नुकतंच पोलिसांनी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवला आहे.

Jagdish Patil

Beed News, 08 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून देशमुख यांच्याशी संबंधित लोकांसह कुटुंबियांचा जबाब घेत आहेत. नुकतंच पोलिसांनी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवला आहे.

वैभवीने (Vaibhavi Deshmukh) आपल्या जबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिच्या जबाबानुसार सरपंच देशमुख यांचे अपहरण आणि हत्या करण्याच्या आदल्या दिवशीच विष्णू चाटेचा त्यांना धमकावणारा फोन आला होता. यावेळी ते फोनवर 10 ते 12 मिनिटे बोलत होते.

तर फोन आल्यामुळे पप्पा खूप घाबरले होते, असंही तिने जबाबात सांगितलं आहे. शिवाय या फोनबाबत पप्पांनीच आपल्याला सर्वराही सांगितलं आणि यावेळी त्यांनी माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असा सल्ला दिल्याचंही जबाबात म्हटलं आहे.

वैभवीच्या जबाबात नेमकं काय?

वैभवीने दिलेल्या जबाबात तिने सांगितलं की, माझे पप्पा मस्साजोगमधून लातुरला (Latur) आले तेव्हा ते अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशीही पप्पा काळजीत दिसत होते. त्यामुळे मी त्यांना काय झालं? असं विचारल्यावर त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले, 'बाळा चांगला अभ्यास कर', त्यानंतर पुन्हा मी त्यांना काय झालं सांगा असं विचारलं.

त्यावर त्यांनी सांगितलं की, "अवादा कंपनीत वाल्मिक कराडची (Walmik Karad) मागणसं खंडणी मागण्यासाठी आली होती. मात्र, त्यांना मी अडवल्यामुळे ते चिडले आहेत. त्याच्या जवळचा माणूस विष्णु चाटे मला फोन करुन जीवे मारण्याची धमकी देतोय. त्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे. माझं काय बरं वाईट झालं आईची व भावाची काळजी घे.", असा जबाब वैभवीने पोलिसांसमोर नोंदवला.

दरम्यान, पोलिसांकडून दोषारोप पत्रात देशमुख कुटुंबियांचे जबाब महत्वाचे ठरणार आहेत. यासाठी सरपंच देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी यांचा जबाब महत्वाचा ठरणार आहे. यासाठी पोलिसांकडून सगळ्यांचे जबाब नोदंवले जात आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT