Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh : धक्कादायक! संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो पाहून काळीज तुटलं, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Santosh Deshmukh viral photos : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच सीआयडीने कोर्टात सादर केलेल्या आरोप पत्रातील देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Jagdish Patil

Beed News, 05 Feb : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने (Santosh Deshmukh Murder) संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच सीआयडीने कोर्टात सादर केलेल्या आरोप पत्रातील देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झालेले फोटो पाहून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो पाहून त्यांची हत्या किती क्रूरपणे केली आहे याचा अंदाज येत आहे. दरम्यान, देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आल्यामुळे राज्यभरातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तर या हत्या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराडशी (Walmik Karad) जवळीक असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. वाढता राजकीय दबाव पाहता मंगळवारी धनंजय मुंडेंनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी हत्येचे हे फोटो समोर येताच या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

व्हायरल फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे तर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ढसाढसा रडले. त्यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी देखील हे फोटो पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं सांगितलं होतं.

मारहाणीचे फोटो पाहून आत्महत्या

अशातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे काळीज पिळवटूव टाकणारे फोटो पाहून एका तरूणाने आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या (Beed) केजमधील एका तरुणाने संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक हरीभाऊ शिंदे (23) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. मारहाणीचे फोटो पाहून त्याने हे टोकाचं पाऊल उचचल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT