Satish Bhosale, Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : खोक्याच्या घरावर कारवाई करणाऱ्या वन विभागाबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "त्यांनी घाईघाईत..."

Suresh Dhas on Beed Forest Department : सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण केल्या प्रकरणी त्याला आता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर खोक्याने ज्या ठिकाणी ही मारहाण केली तिथे पोलिस त्याला घेऊन गेले आहेत.

Jagdish Patil

Beed News, 15 Mar : सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण केल्या प्रकरणी त्याला आता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर खोक्याने ज्या ठिकाणी ही मारहाण केली तिथे पोलिस त्याला घेऊन गेले आहेत.

याआधी वन विभागाने सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर कारवाई करत त्याचं घर जमीनदोस्त केलं. वन विभागाच्या जागेवर हे घर अनधिकृतपणे बांधल्याचा दावा करत वन विभागाने ही कारवाई केली. ही कारवाई करण्याआधी नोटिस पाठवण्यात आली होती पण 48 तासांत कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वन विभागाने दिलं आहे.

मात्र, सतीश भोसलेच्या घरावर कारवाई करायला अतिघाई झाल्याचं म्हणत याबाबत वन विभागाला विचारणा करणार असल्याचं मोठं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता धस आपल्या कार्यकर्त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, "सतीश भोसलेच्या घरावर कारवाई करायला घाई झाली. या कारवाईबाबात वन विभागाकडून संपूर्ण माहिती घेतोय. कारण त्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत, ती जमीन वन विभागाची आहे. तर काही जण म्हणत आहेत ती जमीन वाटप केली आहे. उद्या तिथे मी आम सभेला जाणार आहे त्यावेळी याबाबतची माहिती घेणार आहे."

दरम्यान, पत्रकरांनी खोक्याचं घर पाडण्याचा निर्णय लवकर घेतला का? असं विचारताच ते म्हणाले, घर पाडायला घाई नव्हे तर अति जास्त घाई केली आहे. मात्र, ही कारवाई शासनाने केलेली नाही. तिथल्या काही लोकांनी केली आहे.

याबाबत मी वन विभागाला आणि कलेक्टरांना विचारणा करणार आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आता धस या कारवाईवर नेमकी काय भूमिका घेणार? ते वन विभागाला कारवाईबाबत जाब विचारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT