Pradeep Majhi : जातीबाहेर लग्न करणाऱ्या माजी खासदारावर 12 वर्षांचा बहिष्कार

Pradeep Majhi Inter Caste Marriage : प्रदीप माझी यांनी 12 मार्चला संगीता साहू यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर आदिवासी बत्रा केंद्रीय समितीमधील एका सदस्याकडून प्रदीप यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.
Pradeep Majhi Marriage
Pradeep Majhi Marriage sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pradeep Majhi News : नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी यांना 12 वर्षांसाठी त्यांच्या जातीतून बाहेर काढण्यात आले आहे. प्रदीप यांनी त्यांची जात सोडून दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केल्याबद्दल समाजाने त्यांच्यावर 12 वर्षांचा बहिष्कार टाकला आहे.

धामनागुडा येथील आदिवासी बत्रा समाजाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत प्रदीप माझी यांच्या लग्नावर चर्चा झाली. प्रदीप माझी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांची जात सोडून दुसऱ्या जातीत लग्न केल्याबद्दल 12 वर्षांसाठी समाजातून बंदी घालण्यात आली होती. बैठकीत निर्णय घेण्यात आला की प्रदीप यांच्या घरगुती समारंभात समाजातील कोणतीही व्यक्त सहभागी होणार नाही.

Pradeep Majhi Marriage
Karuna Sharma vs Dhananjay Munde : "मी म्हटलं होतं मंत्रीपद जाणार तर ते गेलं, आता.."; करुणा शर्मा यांची धनंजय मुंडेंबाबत दुसरी मोठी भविष्यवाणी

प्रदीप माझी यांनी 12 मार्चला संगीता साहू यांच्यासोबत विवाह केला. आदिवासी बत्रा यांच्या केंद्रीय समितीमधील एका सदस्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते की प्रदीप यांनी त्यांची जात सोडून दुसऱ्या जातीशी लग्न केले कारण ते स्वतः समाजाचा द्वेष करतात.

बहिणीचाही आंतरजातीय विवाह

प्रदीप यांच्या बहिणीचा देखील आंतरजातीय विवाह केला आहे. प्रदीप यांची बहिणीचे लग्न जगन्नाथ मंदिरात ब्राह्मण कुटुंबात झाले. या आंतरजातीय विवाहविषयी देखील आदिवासी समाजामध्ये नाराजी व्यक्त केली गेले. समाजातून बहिष्कार टाकल्याच्या निर्णयावर अजून प्रदीप माझी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Pradeep Majhi Marriage
Karuna Munde on Satish Bhosale : 'हो खोक्या भाऊ मला एकदा भेटला होता', करुणा शर्मा यांची कबुली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.