Marathwada Mlc Election Results 2026 sarkarnama
मराठवाडा

Marathwada Election Results: सतीश चव्हाणांची चौथ्या टर्मची आमदारकी हिरावली, पराभूत उमेदवाराने सांगितला प्रतापसिंहांच्या विजयामागचा 'चाणक्य' कोण..?

Sharad Pawar NCP: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे अद्यापही काही जागांच्या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे अद्यापही काही जागांच्या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. गेल्या तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाणांना या निवडणुकीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र,या निवडणुकीतील पराभूत उमेदवारानं प्रतापसिंह यांच्या विजयामागचा 'चाणक्य'समोर आणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 23 हजार 360 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत निर्णायक आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली होती. यानंतर आता या निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत दिलीप घुगे यांनी विजयी प्रतापसिंह पाटील यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

दिलीप घुगे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. या त्यांच्या मनाच्या दिलदारपणाचं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. घुगे हे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्यासारखा पदवीधर आमदार होण्यासाठी डॉ. राहुल पाटील यांच्यासारखा चाणक्य, परफेक्ट नियोजन करणारा पाठीराखा भाऊ असावा लागतो, अशी पोस्ट दिलीप घुगे यांनी ट्विटरवर केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीची गेल्या 33 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत अनेकदा मोठे मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. गेल्या तीन टर्म पदवीधरांचे आमदार राहिलेल्या सतिश चव्हाण यांना यंदाच्या निवडणुकीत पदवीधरांनी धक्का दिला. तर रिलस्टार रविराज साबळे हेही 20 हजारांहून अधिकची मतं मिळवत गेमचेंजर ठरले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तर दुसरीकडे पराभूत दिलीप घुगे यांच्याकडून विजयी प्रतापसिंह पाटील यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT