

Marathwada Gradauate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आणि उर्वरित उमेदवारांना बाद करून त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मते हस्तांरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्वामध्ये लक्ष वेधून घेतले ते अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांनी. साबळे यांना तब्बल २० हजार ४५० मते मिळाली आहेत. तेच या निवडणुकीत मराठवाडा पदवीधरचा आमदार कोण असणार? हे ठरवणार आहे.
साबळे यांच्या दुसऱ्या पसंतीची मतंच महायुतीचे सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांचे भवितव्य ठरणार आहे. "माझ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडून येणारा आमदार ठरणार आहे. मी एक प्रस्थापित गिळलायं, अठरा वर्षांचा दुष्काळ संपवलायं", अशा सूचक शब्दात रविराज साबळे यांनी महायुतीचे तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना टोला लगावला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या पंसतीवर गेल्यानंतर रविराज साबळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत या निवडणुकीत आपण कसे आलो? किती कमी वेळात तयारी करून लढलो, प्रस्थापितांना जेरीस आणले यावर खोचक भाष्य केले. मला तिसऱ्या फेरी अखेरीस २० हजार ४५० मते मिळाली आहेत. मी प्रस्थापित उमेदवार नाहीये, अपक्ष आहे. अजूनपर्यंत निकाल कोणाच्याच बाजूने नाही. आता दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत .
४१ व्या क्रमांकाकडून एक एक उमेदवार बाद करत जाणार आणि त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते दिली जाणार. मी तिसऱ्या नंबरला आहे, मी अपक्ष आहे.मी २४ सप्टेंबरला निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. २८ दिवसांचा प्रचार केला, ज्यामध्ये जो मतदारसंघ पदवीधरांचा आहे, परिषदेची जागा, पक्षांची मक्तेदारी असते त्यामध्ये घुसून मी तिसऱ्या नंबरवर आहे. गमंत म्हणजे माझ्या मतांवरतीच निवडून येणारा उमेदवार ठरणार आहे असे साबळे म्हणाले.
"माझ्या दुसऱ्या क्रमांकाची मते म्हणजे या दोघांच भवितव्य आहे. मी एक प्रस्थापित गिळलायं, अठरा वर्षाचा दुष्काळ संपवलाय. अजून निकाल लागलेला नाही, मतमोजणी चालू आहे, निकाल लागलेला नाही, त्यासाठी दुपारचे तीन वाजतील", अशा शब्दात रविराज साबळे यांनी प्रस्थापितांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. रविराज साबळे यांना रीलस्टार म्हणून हिणवले गेले होते. परंतू तेच रविराज साबळे तीन टर्म आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांच्या पराभवला कारणीभूत ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.