Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar in School : विद्यार्थ्यांच्या खिचडीवर मंत्री अब्दुल सत्तारांचा ताव...

Shivsena News : विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चविष्ट असतो का? हे तपासण्यासाठी सत्तार विद्यार्थ्यांसोबतच खिचडी खाण्यासाठी बसले.

Jagdish Pansare

Marathwada Political News : राज्य सरकारमधील एक मंत्री अचानक ग्रामीण भागातील शाळेत आले आणि थेट विद्यार्थ्यांबरोबर बसून खिचडी खाऊ लागले. (Shivsena News) हे चित्र आहे राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील एका शाळेतील. विकासकामांचे उद्घाटन करताना रस्त्यातील एका जिल्हा परिषद शाळेत मंत्र्यांनी आपला मोर्चा वळवला.

शाळेत माध्यान्य भोजनाची सुटी झाली होती, विद्यार्थी खिचडी खात होते. मग काय मंत्र्यांनाही खिचडी खाण्याचा मोह झाला आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूलाच मांडी घातली. (Abdul Sattar) एखादा दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी यावा आणि त्याने सोबत बसून खिचडी खावी, असेच चित्र या वेळी निर्माण झाले होते. (Shivsena) विद्यार्थ्यांना मंत्र्यांनी आपली खिचडी खाल्ली याचा आनंद होता, तर शिक्षकांना मात्र अचानक आलेल्या मंत्र्यांमुळे घाम फुटला होता.

सत्तार यांनी मतदारसंघातील बाभूळगाव येथे विविध विकासकामाचे उद्घाटन केले. परतीच्या प्रवासात त्यांनी गावातील जि.प. शाळेला अचानक भेट दिली. (Marathwada) या वेळी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची वेळ झाली होती. मग अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चविष्ट असतो का? हे तपासण्यासाठी ते विद्यार्थ्यांसोबतच खिचडी खाण्यासाठी बसले.

शासनाच्या निकषाप्रमाणे ठरलेल्या दिवशी पोषण आहार दिला जातो का, दिला जाणारा आहार वेळेवर दिला जातो का, ही सर्व माहिती त्यांनी विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेतली. तसेच त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आपण मदत करणार असून, या माध्यमातून मला शाळेतील कामकाजाचा नियमित व्हिडिओ शेअर करत जा, अशा सूचना या वेळी सत्तार यांनी शिक्षकांना दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT