Marathwada Political News : राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी भाजपचे खासदार बधुरी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. (Parbhani News) पण खासदार दानिश आणि उदयननिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या विधानावर मात्र मौन बाळगले, अशी टीका भाजपचे प्रवक्ते डाॅ. उमेश देशमुख यांनी केली.
पत्रकारांना चहा पाजा, त्यांना धाब्यावर जेवायला न्या, अशा सूचना दिल्याची (BJP) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात गदारोळ सरू आहे. (NCP) असे असताना पाथरी येथे देशमुख यांनी पत्रकारांना चहा व बिस्किटे दिली.
यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाचे पालन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार) राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांनी परभणी (Parbhani) येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण, कंत्राटी नोकरभरती व परभणी महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आदेशाचे पालन झाल्याची चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार ) राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याबद्दल तळमळीने बोलत आहेत. मात्र, राष्ट्रपतिपदी त्यांची निवड होताना त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला व त्यांना बिनविरोध निवडून आणण्याऐवजी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला, याचे उत्तर खान यांनी दिले पाहिजे.
भाजपचे खासदार बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात पक्षाने बिधुरी यांना नोटीस बजावली आहे. परंतु खासदार दानिश अली यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून संसदेत केलेल्या असंसदीय वक्तव्यांचा तसेच उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवला पाहिजे, या वक्तव्याचा खान निषेध करणार आहेत का ? असा सवालही उमेश देशमुख यांनी उपस्थित केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.