Abdul Sattar-Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar V/s Raosaheb Danve : दानवेंच्या टीकेनंतर सत्तार साडी घेऊन दारोदारी!

Sattar speeds up saree distribution program after Raosaheb Danven's criticism : स्वतः सत्तार गावागावात जाऊन साड्या वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत. साड्या वाटपाचे टार्गेटही वाढवण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच रावसाहेब दानवे यांच्या टीकेनंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा सत्तार यांचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

Jagdish Pansare

Shivsena-BJP Political News : राजकारणात कुरघोडी करण्याचा जो काही आनंद नेत्यांना मिळतो तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नसतो. सध्या सिल्लोड-सोयगाव या मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात याचा अनुभव सर्वसामान्यांना येत आहे. लोकसभेच्या जालना मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि तिथून सत्तार-दानवेंचे बिनसले. आता या दोघांकडून ऐकमेकांना टोकाचा विरोध सुरू झाला आहे.

विधानसभेची निवडणूक महिनाभरावर असताना कुरघोडीची एकही संधी सत्तार-दानवे सोडत नाहीयेत. (Abdul Sattar) ऐकमेकांविरोधात मोर्चे काढून झाल्यानंतर आता गावागावात भाषणबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील लाडक्या बहीणींना साड्यांचे वाटप सुरु केले आहे. पण काही दिवसांपुर्वी वांगी बुद्रक आणि बहुली गावात वादातून सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिलांनी होळी केली.

ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा मेळावा सुरू असतांनाच हा प्रकार समोर आला. यावर सत्तार यांनी ते बोगस लोक आहेत, भाडे के टट्टू, असे म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. तर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सत्तारांचे साड्या वाटप आणि त्याची काही गावात झालेली होळी यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली.

बाया आमच्या आणि साड्या तुमच्या, असे कसे चालेल? स्वाभीमानी महिला या साड्या कशा स्वीकारतील ? सत्तार साड्या कशासाठी वाटतो आहे? निवडणुकीच्या तोंडावर लोकांना अमिष दाखवतो का? अशा शब्दात सत्तार यांना सुनावले. पण दानवे यांच्या या टीकेचा उलटाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (Raosaheb Danve) दानवे यांनी टीका केल्यानंतर सत्तार यांच्या या साड्या वाटपाच्या कार्यक्रमाचा वेग अधिकच वाढला.

स्वतः सत्तार गावागावात जाऊन साड्या वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत. साड्या वाटपाचे टार्गेटही वाढवण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच रावसाहेब दानवे यांच्या टीकेनंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा सत्तार यांचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील साड्या वाटप कार्यक्रमात काही गावांमध्ये त्या जाळण्याचा प्रकार घडला असला तरी, सत्तारांनी माघार घेतलेली नाही. उलट साड्यांसोबत पंजाबी ड्रेस, लुगडी देखील वाटली जात आहे.

नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी निमित्त बहिणींची कृतज्ञता म्हणून लाडक्या बहिणींना ही भेट दिली जात असल्याचे ते सांगतात. खंडाळा, सराटी, पिंपळदरी, वसई या गावांमध्ये नुकताच हा कार्यक्रम घेण्यात आला. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी असून कधीच बंद होणार नाही. आगामी काळात लाडक्या बहिणींच्या पगारात तीन हजारांची भरघोस वाढ होईल, असा विश्वास उपस्थित बहिणींना सत्तार देत आहेत.

बहिणींची सेवा करतांना तुमचा भाऊ कुठेही कमी पडणार नाही. विकासकामे असतील किंवा वयक्तिक कामे असतील ते करतांना कधीही जात, धर्म,पक्ष बघितला नाही. सिल्लोड- सोयगाव मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे सांगायलाही सत्तार विसरले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT