Minister Abdul Sattar in trouble News sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar in trouble News : मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या सत्तारांचे मंत्रीपद धोक्यात ?

CM Eknath Shinde : कायम सत्तार यांच्या पाठीशी `चट्टाण`, सारखे उभे राहणारे शिंदे यावेळी काय भूमिका घेतात ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अंतर्गत असलेल्या अकोला कृषी विभागाच्या पथकाने बोगस खत, बियाणे विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. (Abdul Sattar in trouble News) या धाडीत सत्तारांसोबत वावरणाऱ्या खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सत्तार यांचे स्वीय सहायक, माजी पदाधिकारी धाड टाकतांना सोबत होते आणि त्यांनी एका विक्रेत्याकडे पाच लाखांची मागणी केल्याचा आरोपही केला जातोय.

आता हे प्रकरण सत्तारांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. (Maharashtra) नेहमीप्रमाणे दिपक गवळी माझा स्वीय सहायक नाही, तो कृषी अधिकारी आहे, सामान्य शेतकऱ्याने सांगितले तरी बोगस खत, बियाणे विक्रेत्यांवर धाड टाकली जावू शकते. (Abdul Sattar) शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना दहा वर्ष जेलमध्ये टाकणार, अशी सारवासारव सुरू केली आहे.

कृषीमंत्री झाल्यापासून सत्तारांनी अनेक वाद ओढवून घेतले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असतात, जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का ? राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द, सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी कृषी विभागामार्फत पावत्या फाडून केलेली वसुली, गायरान जमीनीचे नियमाबाह्य वाटप अशी एक न अनेक प्रकरण गेल्या ८-१० महिन्यात घडली. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील मनस्ताप सहन करावा लागला.

ऐन नागपूरच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीनीचे प्रकरण समोर आले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा बचाव केला. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी संपुर्ण राज्यात सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी व महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली होती. पण तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तारांच्या पाठीशी उभे राहिले होते.

सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठीच्या वसुलीचे प्रकरण देखील राज्यभरात गाजले. स्वतः विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थितीत करत चौकशीची मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगत वेळ मारून नेली होती. त्यानंतर पुढे काहीच झाले नाही, आणि सत्तारांना अभय मिळाले.

परंतु वाद आणि आरोप काही केल्या सत्तारांची पाठ सोडतांना दिसत नाहीये. अकोला येथील कृषी पथकाने बोगस खत, बियाणे शोधण्यासाठी टाकलेली धाड आणि त्या सत्तारांच्या सोबत वावरणाऱ्या खाजगी व्यक्तींच्या समावेशाने विरोधकांना आयते कोलित सापडले आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सध्या सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना हटवण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्या पाच मंत्र्यांमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.

सावंत, सत्तार, भुमरे यांना मंत्रीमंडळातून हटवा, असे आदेशच शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या कृषी विभागाचे हे धाड प्रकरण समोर आल्याने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. एकीकडे भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला जातोय. त्यामुळे शिंदे तणावात आहेत, त्यात पाच मंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढवला जातोय. यातून शिंदे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतांनाच सत्तार यांच्या या धाड प्रकरणाने मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे यापुर्वी कायम सत्तार यांच्या पाठीशी `चट्टाण`, सारखे उभे राहणारे शिंदे यावेळी काय भूमिका घेतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT