Mumbai News : समाधानकारक काम न नसणाऱ्या शिवसेनाच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवा, असा आदेश भाजप हायकमांडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह पक्षाची बैठक बोलावली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Chief Minister called a meeting of Shiv Sena after BJP high command suggested to drop the ministers)
याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (ता. १२ जून) रात्री आमची बैठक बोलावली आहे. आमची पक्षाची बैठक आहे. त्या पक्षाच्या बैठकीत सर्वकाही चर्चा होईल. पुढची रुपरेषा आणि दिशा मुख्यमंत्री आम्हाला देतील. त्यानुसार आम्ही महाराष्ट्रात काम करणार आहोत.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडकडून हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. बंडाच्या वेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या सहकाऱ्यांकडून अवघ्या दहा महिन्यांत मंत्रिपद कसं काढून घ्यायचं, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे, त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आज बोलावली बैठक महत्वाची मानली जात आहे.
या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली आहे. यातील चौघे तर अगोदरच्या सरकारमध्येही मंत्री होते, त्यामुळे त्यांना डावलण्याचा अवघड कामगिरी शिंदे यांच्यावर येऊन पडली आहे.
भाजपच्या अहवालात ज्यांच्याबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळण्यात यावे, अशी सूचना दिल्लीतील हायकमांडने केली आहे, त्यामुळे या मंत्र्यांना वगळावे, तर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज पक्षाची बैठक बोलावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.