Sanjay Shirsat Allegation News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : कामगारांना साहित्य वाटपात घोटाळा! माझ्या पीएला सांगलीहून फोन

Minister Sanjay Shirsat has demanded an SIT investigation into alleged irregularities in the labour materials distribution scheme : कोणत्याही गोडावून मधून हे साहित्य पुरवले जाते. यात एजंट लोकांमार्फत हा मोठा घोटाळा सुरू असून यात कोट्यावधींचा भ्रष्टाराचार झाला आहे.

Jagdish Pansare

योगेश पायघन

Shivsena News : राज्यभरात कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्य वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला. 'तुमचे भांडे आले आहेत, ते घेऊन जा असा फोन माझ्या पीएला सांगलीहून आला' छत्रपती संभाजीनगर कुठे अन् सांगली कुठे? असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणीही शिरसाट यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कामागारांना साहित्य वाटपात सुरू असलेल्या घोळाची माहिती दिली. त्यासाठी आपल्याच पीएला सांगलीहून भांडे घेऊन जाण्यासाठी कसा फोन आला, याचा किस्साही सांगितला. माझा पीए छत्रपती संभाजीनगरचा त्याला सांगलीवरून फोन आलाय. तुमचे भांडे आलेत ते भांडे घेऊन जा. सांगली कुठे छत्रपती संभाजीनगर कुठे. कामगारांना संसारोपयोगी साहीत्य वाटपात राज्यभरात घोटाळा झालाय.

बोगस याद्या बनवून हा सगळा प्रकार सुरू आहे. या योजनेची केवळ छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याची नव्हे तर राज्यभरातील सर्व गैरप्रकाराची एआयटी चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र घरेलू कामगार महामंडळाअंतर्गत शासनाची कामगारांना मदत करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य देण्याची भूमिका होती. त्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय. याचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे.

लाभार्थी सोडाच इतरांची नावे या योजनेत अॅड केले जात आहेत. यात अधिकाऱ्यांसह एजंटची मिलीभगत आहे. हा गंभीर प्रकार आहे, याची एसआयटीकडून चौकशी झाली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका एजंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दोषींना जेलमध्ये टाकले पाहीजे, माझ्याकडे तक्रारी आल्या. त्यात चौकशी करायला लावली. कोणत्याही गोडावून मधून हे साहित्य पुरवले जाते. यात एजंट लोकांमार्फत हा मोठा घोटाळा सुरू असून यात कोट्यावधींचा भ्रष्टाराचार झाला आहे. बोगस नावे अॅड करून त्यांच्याकडून दोन ते चार हजार रुपये घेण्याचे काम सर्रास सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे, असे मंत्री शिरसाट म्हणाले.

पोलीस दलातून चोरटे, दरोडेखोरांना मदत ?

छत्रपती संभाजीनगरात जे दरोडे, घरफोडी, चोऱ्या झाल्या त्यात छोटे मोठे चोर आहेत. त्यांना काही पोलीस विभागातील लोक सहकार्य करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी तपास करावा. एका दिवसात चोर आले नाहीत, ही एक साखळी आहे. ती शोधून काढण्याच्या सुचना पोलीस आयुक्तांना दिल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलीस दलाचे वाभाडे काढले होते. त्यानंतरही लागोपाठ तीन दरोडे पडले. तसेच चोऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे आज शिरसाट यांनी पुन्हा एकदा पोलीसांवर निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती व्हावी यासाठी शिवसेना सकारात्मक आहे. आम्ही युती करण्याच्या मनस्थितीत आहोत. युती व्हावी असा आमचा मनोदय आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT