Beed NCP News Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP News : निष्ठेचे फळ; शरद पवारांकडून क्षीरसागरांची जिल्हाध्यक्षपदी निवड

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्यातील नवीन सत्ता समिकरणानंतर जिल्ह्यातील तीन आमदार व अनेक बड्या नेत्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गोटात प्रवेश केला. (Beed NCP News) आमदार संदीप क्षीरसागर मात्र प्रवाहाच्या विरोधात राहीले. अखेर त्यांना या निष्ठेचे फळ मिळाले आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. बुधवारी (ता. १९) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी पंचायत समितीचे सभापतीपद, जिल्हा परिषदेच्या सभापती म्हणूनही काम केले. २०१७ च्या नगर पालिका निवडणुकीत त्यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व दुसरे काका माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. (NCP) नगर पालिका निवडणुकीतही काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून त्यांनी चांगले यश मिळविले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आमदार असताना जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Marathwada) विधानसभा निवडणुकीत देखील जेष्ठ नेते शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी आणि पाठबळ दिले. या विश्वासाचे सोने करत त्यांनी विधानसभेला विजय मिळविला. पहाटेच्या शपथविधीनंतरही सर्वप्रथम संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे जाहिर केले होते.

त्यामुळे क्षीरसागर यांच्यावर पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वास वाढला होता. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून क्षीरसागर यांना ताकद देण्यासह अगदी केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या रस्ते कामांसाठी खुद्द शरद पवार व सुप्रिया सुळे क्षीरसागर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री गडकरींना भेटल्या. दरम्यान, पंधरवाड्यापूर्वी राज्यात नवे सत्ता समिकरण तयार झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनाही मंत्रीपद भेटले.

आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह इतर बड्या नेत्यांनी सत्तेची बाजू जवळ केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी संदीप क्षीरसागर यांनी आपली निष्ठा सदैव शरद पवारांसोबत असे जाहीर केले. या निष्ठेचे फळ संदीप क्षीरसागर यांना मिळाले असून त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. आता सत्तेच्या बाजूने सहा आमदार आणि अनेक बडे नेतेही अजित पवार यांच्या बाजूने आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यात आव्हानात्मक स्थिती आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीची घडी बसविण्यासाठी प्रयत्न करताना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र, पंचातय समिती सदस्य ते आमदार असा बीड मतदार संघापुरता राजकिय राबता असणाऱ्या क्षीरसागर यांना या पदाच्या निमित्ताने जिल्हाभर राबता वाढविण्याचीही संधी आहे.

शरद पवारांना माणनारा मोठा मतदार वर्ग जिल्ह्यात आहे. आगामी काळात भाजप-राष्ट्रवादीतील नेत्यांच्या गर्दीमुळे विधानसभेच्या उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाल्यानंतर बड्या नेत्यांची एंट्री राष्ट्रवादीत निश्चितच मानली जात आहे. त्यामुळे त्यांना आता काम करण्याची चांगली संधी देखील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT