Sengaon APMC Election News
Sengaon APMC Election News  Sarkarnama
मराठवाडा

Sengaon APMC Election News : आजी- माजी आमदारांच्या युतीने बाजार समितीवर भाजपची सत्ता..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : सेनगाव बाजार समितीचे (Sengaon APMC Election News) सभापती पद काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादामुळे सलग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भाजपाच्या वाट्याला आले आहे. अभद्र युतीतून सत्ता स्थापन केल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण होत आहे. बाजार समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली.

यामध्ये माजी आमदार भाऊराव व शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश यांच्या आशिर्वादामुळे (bjp)भाजपचे अशोक ठेंगल यांची सभापती पदी निवड झाली. तर काँग्रेसने उपसभापती पदावर समाधान मानले. या बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागांसाठी ३० एप्रिलला मतदान झाले होते. त्याच दिवशी निकाल स्पष्ट होऊन आजी-माजी आमदारासह (ठाकरे गट) शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उभ्या केलेल्या पॅनलचा १३ जागेवर विजय झाला होता.

तर विरोधकांसोबत जायचे नसल्याने राष्ट्रवादीने मात्र या निवडणूकीतुन माघार घेतल्याचे पहायला मिळाले. ही निवडणूक पार पडल्यानंतर सभापती पदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Hingoli) भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. त्यामुळे इतर कुणालाही संधी न देता आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांनी अशोक ठेंगल यांचीच सभापतीपदी निवड केली.

तर उपसभापती पदासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. मात्र उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले पाटील यांची निवड करण्यात आल्यामुळे सेनेला पुढच्या अडीच वर्षात संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर भाजप, शिंदे गट व ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसकडून जुळवून घेण्याचे राजकारण पहायला मिळत आहे.

बाजार समितीमध्ये भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन अभद्र युती केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने या निवडणुकीतून अंगच काढून घेतले होते. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील व भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र सेनगावच्या बाजार समितीत मागच्या पाच वर्षात व यावेळी देखील एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. विधानसभा आणि बाजर समिती निवडणुकीत दोन्ही नेते वेगळी भूमिका घेतात.

मागच्या निवडणूकीत सुध्दा भाऊराव पाटील व तान्हाजी मुटकुळे यांनी एकत्र येऊन पॅनल निवडून आणले होते. तेंव्हा भाजपकडे सभापती पद तर काँग्रेसला उपसभापती पदावर समाधान मानावे लागले. यावेळी सुध्दा तीच परिस्थिती पहायला मिळाली. भाजप आणि काॅंग्रेसचे हे सत्तेसाठीचे सोयीचे राजकारण शेतकऱ्यांच्या किती हिताचे ठरेल हे येणारा काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT