Bjp Leader Pankaja Munde News,
Bjp Leader Pankaja Munde News,  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानेही हेरली पंकजा मुंडेंची नाराजी; म्हणाले, कोणत्या घोड्यावर...

सरकारनामा ब्युरो

Nanded News : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्येही सुरु आहेत. भाजपमध्ये पंकजा यांच्यावर वारंवार अन्याय होतोय. त्यांनी आगामी निवडणुकांपूर्वी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांच्या अनेक हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.

तर शिवसेना ठाकरे गटाच्या एका आमदाराने त्यांनी शिवसेनेत (Shivsena) यावं अशी विनंती केली आहे. यावरून अनेक राजकीय वावड्या उठत आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील पंकजा मुंडेना सल्ला दिला आहे. ''पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मराठवाड्यातल्या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना उत्तम राजकीय जाण आहे. त्यांना अनेक वर्षापासून काम करताना मी पाहिलं आहे. पण त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. कुठल्या पक्षात जावं आणि कुठल्या पक्षात यावं, की आहे त्याच पक्षात राहावं, हा त्यांचा प्रश्न आहे. यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. पण कुठल्या घोड्यावर बसून फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचं आहे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

पंकजा मुंडेंची नाराजी का?

गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे यांना भाजपमधील मुख्य प्रवाहातून बाजूला केल्याचे चित्र आहे. पक्षाकडून केली जाणारी महत्त्वाची आंदोलने असोत वा मराठवाड्यातील महत्त्वाचे कार्यक्रम पंकजा मुंडे यांची गैरहजेरी त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यातून निसटत नाहीत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात भाजपाचा विस्तार झाला. पण त्याच्याच कन्या पंकजा मुंडे यांना गेल्या काही वर्षांपासून भाजपात डावललं जातयं. पंकजा मुंडे यांना पक्षात डाववलं जात असल्याची नाराजी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. अनेकदा त्यांना भाजप सोडण्याचाही सल्ला विरोधकांनी दिला. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण कायम भाजपसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT