Nana Patole यांच्याकडे आणखी एक दिवस, नेत्यांचा रोष कसा थोपवणार?

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकीतच त्यांनी विरोध का दर्शवला नाही?
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांनी नामांकन दाखल केल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांमध्ये रोष उफाळून आला आहे. दोन दिवसांत यावर तोडगा काढू, असे नानांनी काल पत्रकारांना सांगितले. आता पटोलेंकडे आज आणि उद्याचा एक दिवस शिल्लक आहे.

कॉंग्रेस (Congess) नेत्यांनी नाकाडेंना विरोध केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीसुद्धा त्यांचीच री ओढत आम्हाला हा निर्णय मान्य असे सांगितले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीतच त्यांनी विरोध का दर्शवला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीने शिक्षक संघाच्या निवडणुकीत शिवेसनेचे (Shivsena) गंगाधर नाकाडे यांना समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

सर्वच प्रमुख नेत्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. गुरुवारी माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पटोले यांची भेट घेतली. त्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली. तायवाडे यांनी आपण संघटनेसोबत राहू, असे सांगून नाकाडे यांना सहकार्य केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वांचा रोष बघून पटोले यांनीसुद्धा आता आपल्याला हा निर्णय मान्य नाही असे जाहीर केले. दोन दिवसानंतर काय तो निर्णय घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Nana Patole
Patole on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची आम्हाला चिंता वाटते : नाना पटोले असं का म्हणाले?

उमेदवार ठरवण्यापूर्वी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. त्याच वेळी नागपूरची जागा शिवसेनेला देताना नाना पटोले यांनी विरोध का दर्शवला नाही, असा सवाल आता काँग्रेसचेच नेते करीत आहेत. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही रवींद्र भोयर यांना बदलून मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे बावनकुळे आरामात विजयी झाले.

पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवार बदलला तर मतांचे विभाजन निश्चित होणार आहे. आघाडीतच बेबनाव असल्याचा संदेश यातून मतदारांमध्ये जाण्याचा धोका आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांसोबत बोलताना दोन दिवस थांबा, असे सांगून उमेदवार बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेसचे आमदार व नेतेसुद्धा अडबाले किंवा झाडे यांच्यापैकी एकाला काँग्रेस पाठिंबा जाहीर करणार असल्याचे दाव्याने सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com