MLA Santosh Bangar News Sarkarnamana
मराठवाडा

Santosh Bangar News : आमदार बांगरांचा खळबळजनक दावा; तर ठाकरे गटाचे नेते...

Sachin Waghmare

Hingoli News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच पक्षात आता लगीनघाई सुरु झाली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीने काही मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. संवाद मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधान मोदींच्या कामांचे कौतुक करत राहुल गांधींवर हातवारे करीत टीका केली.

हदगाव येथील संवाद मेळाव्यावेळी आमदार बांगर यांनी हातवारे करून राहुल गांधीवर टीका केली. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या विरोधात माणूस आहे का ? अशी विचारानं करीत बांगर यांनी शरीराचे हाताचे हावभाव करत अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. (Santosh Bangar News)

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखडे येत्या काळात शिंदे गटाला मदत करतील, असा दावा बांगर यांनी केला. वानखडे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा शिंदे गटाचे काम करतील. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवाराला हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि हदगाव विधानसभेतून मोठी लीड देणार असल्याचे बांगर म्हणाले.

यावेळी आमदार बांगर यांनी नागेश पाटील अष्टीकरांवर नाव न घेता टीका केली. नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांकडून पैसे घेतले, असं म्हणत आमदार बांगर यांनी गंभीर आरोप केले. दोन तीनशे लोकांपासून पैसे घेतले. नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil ashtikar) हे नाग आहेत. त्यांच्या लागू नका, असे स्पष्ट केले.

त्यांच्या विधानाची नेहमीच चर्चा होते

या संवाद मेळाव्यावेळी आमदार बांगर (Santosh Bangar) यांनी केलेले हातवारे व टीका यामुळे त्यांच्या विधानाची नेहमीच चर्चा होते असते. त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधाने अजूनही चर्चेत आहेत. नेहमीच ते कार्यक्रमातून टीका करीत असताना वादग्रस्त टीका करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात.

SCROLL FOR NEXT