Lok Sabha Election 2024 : अजित पवार दिल्लीला रवाना; अमित शाह ठरवणार जागावाटपाचा अंतिम फाॅर्म्युला?

Ajit Pawar Delhi Tour : जागावाटपाबाबत महायुतीत अजूनही खलबते सुरु असल्याचे दिसत आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीची रणनीती आखत आहेत.महाराष्ट्रात मात्र अद्यापही महाआघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जिंकण्याची क्षमता असलेल्या आणि ताकदवान उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा विचार दोन्ही बाजूकडून विचार केला जात आहे. दरम्यान जागावाटपाबाबत महायुतीत अजूनही खलबते सुरु असल्याचे दिसत आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Adhalrao Will Join NCP : आढळराव 20 वर्षांनंतर स्वगृही राष्ट्रवादीत परतणार; शिरूरमध्ये पुन्हा कोल्हेंशी कुस्ती

दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. यात महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे. जागावाटपावर आजच अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर महत्त्वाची पत्रकार परिषद होणार, अशीही शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Nanded BJP News : चिखलीकर- चव्हाण यांच्या लढतीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांनतर आता अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीकडे रवाना झाले आहेत. लोकसभेच्या दृष्टीने जागावाटप आणि उमेदवार बदलाबाबत अंतिम चर्चा होणार आहे. तर आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर महायुतीतील तीन्ही पक्षांचे जागांची निश्चिती होणार आहे. यानंतर उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हटले होते की, 'जागावाटपाबाबत आमचं 80 टक्के काम झाले आहे. जे राहिले आहे त्याबाबत लवकरच काम पूर्ण करु, आमची दिल्लीत लवकरत बैठक होईल. यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतले जाईल.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com