Abhijeet Dipke Sarkarnama
मराठवाडा

Jantar Mantar protest: दिल्लीच्या जंतरमंतरपेक्षाही मोठा एल्गार! सीजेपी थेट रस्त्यावर उतरणार; अभिजीत दीपकेंच्या इशाऱ्याने सरकारची झोप उडाली!

Jantar Mantar protest over student demands News : विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून काही आश्वासने देण्यात आली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यासोबतच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत.

Sachin Waghmare

Mumbai News : दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सीजेपीकडून महिनाभरापूर्वी मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून काही आश्वासने देण्यात आली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यासोबतच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यामुळे आता जंतरमंतरवर जे आंदोलन झाले, त्याहीपेक्षा मोठे आंदोलन पाच सप्टेंबरला दिल्लीमध्ये होणार आहे, असा इशारा छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपके यांनी दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची झोप उडणार आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडून आणखी एका आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पाच सप्टेंबर रोजी एक शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जे आंदोलन झाले होते, त्यानंतर 25 जुलै रोजी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती, ती आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाहीत, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना जी आश्वासने देण्यात आली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीत. सरकार म्हणत आहे की, कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही, पण कोर्ट म्हणते आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त लिस्ट द्या, मात्र सरकार यादी देत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची आज वेळ का आली? जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचा शेवटचा पर्याय असतो. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिले असते आणि रोजगाराच्या संधी दिली असती तर मनोज जरांगे यांना आंदोलन करावे लागले असता का? असा सवाल यावेळी दिपके यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT