BJP News: सीजेपीला पाठिंबा, प्रधानांच्या राजीनाम्याची चिरफाड, प्रल्हाद जोशींनाही डिवचलं; भाजप नेत्याच्या मुलीनं उडवली खळबळ

Dharmendra Pradhan resignation: नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात सीजेपीसह जेन झी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं. हे आंदोलन 20 जून रोजी सुरू झाले आणि ते तब्बल 36 दिवस सुरू राहिले.
Yashswini raje Singh CJP bjp .jpg
Yashswini raje Singh CJP bjp .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: दिल्लीतील जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं केंद्र सरकारला घाम फोडला. सुमारे तीस दिवस हे आंदोलन सुरू होतं. आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मोदी सरकारकडून नवे शिक्षणमंत्री म्हणून प्रल्हाद जोशींकडे जबाबदारी सोपवण्यात आली. या जोशींवर भाजप नेत्याच्या मुलीनं थेट हल्लाबोल केला आहे. तसेच थेट सरकारला हादरवणाऱ्या सीजेपीला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी सिंह यांनी नव्या शिक्षणमंत्र्यांवर टीकेची झोड उठवतानाच कॉक्रोच जनता पार्टी पाठिंबा दर्शवला आहे. एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलीनेच सीजेपीला पाठिंबा दिल्यानं भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह या व्यवसायानं कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवतानाच प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून झालेल्या नियुक्तीला 'एक वाईट विनोद' म्हणत आपल्याच पक्षाच्या सरकारला डिवचलं आहे.

यशस्विनी सिंह यांनी स्वतः जंतर मंतर येथे सीजेपीने आयोजित केलेल्या आंदोलनात भाग घेतला होता. तसेच त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा पत्रावरुनही टोला लगावला आहे. यशस्विनी यांनी प्रधानांची त्यांच्या "राजीनामा पत्रातील भाषा ही आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप किंवा जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीची वाटत नसल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी प्रधानांची राजीनामा पत्रातील भाषा ही एका 'शहीद'सारखी असल्याचा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला होता.

Yashswini raje Singh CJP bjp .jpg
Dharashiv ZP school : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या फोननंतरही शाळेला शिक्षक मिळेना; धाराशिव झेडपीमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या; ग्रामस्थही रस्त्यावर

उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदर मतदारसंघाचे यशस्विनी यांचे वडील विक्रम सिंह हे भाजपचे माजी आमदार राहिले आहेत. मात्र, त्यांचा 2024 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार चंद्र प्रकाश यांनी पराभव केला होता. यशस्विनी यांनी आपण आपल्या वडिलांशी राजकारणावर चर्चा करत नसल्याचे सांगितले.

देशभरात खळबळ उडवलेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी गैरप्रकारांविरोधात 'जनरेशन-झी'च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन २० जून रोजी सुरू झाले आणि ते ३६ दिवस चालले. २५ जुलै रोजी सरकारने विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्या मान्य केल्यावर आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर हे आंदोलन संपले.

Yashswini raje Singh CJP bjp .jpg
Nanded district Bank election : नांदेड जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरवताना अशोक चव्हाण कोणाला झुकते माप देणार? कदम-कवळे यांच्यात स्पर्धा!

धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रावरही केली टीका नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात सीजेपीसह जेन झी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं. हे आंदोलन 20 जून रोजी सुरू झाले आणि ते तब्बल 36 दिवस सुरू राहिले. अखेर या सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आणि 25 जुलै रोजी सरकारने विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्या मान्य केल्यावर आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. यानंतर सीजेपीनं हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com