केज (जि. बीड) : नगरपंचायत निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर गेलेल्या काँग्रेसला सत्तेत मात्र दुसऱ्या क्रमांकाचा वाटा मिळणार आहे. (Beed) जनविकास आघाडी व काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेबद्दल समझोता झाला आहे. (Congress) आघाडीचा नगराध्यक्ष तर काँग्रेसला उपनगराध्यक्षपद दिले जाणार आहे. (Marathwada) केज नगरपंचायत निवडणुक अगदी रंगतदार झाली.
विशेष म्हणजे भाजपच्या नमिता मुंदडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना या निवडणुकीत भाजपचे चिन्हच गायब होते. दरम्यान, निकाल देखील धक्कादायक लागले. मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादीलाही पाचच जागा मिळाल्या. (Kej Nagar Panchayat Election Updates)
जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येलाही पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या १३ उमेदवारांना २७८ मतांवर समाधान मानावे लागले. सेनेच्या ११ उमेदवारांची अनामत जप्त झाली. तर, जनविकास परिवर्तन आघाडीला आठ जागा मिळाल्या. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी दोन्ही पक्षांच्या जागा आठ होत्या.
तर, स्वाभिमानी पक्षाने एक जागा जिंकल्याने त्यांना मात्र सत्तेची चावी आमच्याच हाती असा भ्रम झाला होता.मात्र, बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जनविकास आघाडी आणि काँग्रेसने आपले गाव आपले सरकार असा नारा देत एकत्र येण्याची घोषणा केली. खासदार रजनी पाटील यांच्या शिवनेरी निवासस्थानी आघाडी व काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली.
या निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर, हारूण इनामदार व अंकुश इंगळे यांची आघाडी करून लढण्याची खेळी कांहीअशी का होईना यशस्वी झाली आहे. त्यामुळे कोणालाही सत्ता स्थापनेसाठी इतरांची मदत घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार हा समझोता झाला.
यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेस काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, पशूपतीनाथ दांगट, विजयकुमार भन्साळी शकील इनामदार, हाजीमौला सौदागर तर जनविकास परिवर्तन आघाडीचे अंकुश इंगळे, हारूण इनामदार व दिलीप गुळभिले हे उपस्थित होते.
कोणालाच बहुमत मिळाले नसल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या शहराचे मुळ रहिवासी असलेल्या लोकांनी एकत्र येऊन 'आपलं शहर, आपलं सरकार' समजून बाहेरच्यांना सत्तेपासून दूर ठेवून पाच वर्ष खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने नियुक्त पदाधिकारी काम करतील. जनविकास परिवर्तन आघाडीचा नगराध्यक्ष तर काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष असे सूत्र ठरल्याचे अंकुश इंगळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.