औरंगाबाद : शहराचा शाश्वत विकास खाम नदीच्या पुनरूज्जीवन या कामातून दिसतो. शासनासोबत येत संस्थांनी स्तुत्य असे खाम नदीचे पुनरूज्जीवन केले आहे. (Aurangabad) राज्यातील इतर महानगर पालिकांच्या आयुक्तांसमोरही खाम नदीच्या या कामाचे सादरीकरण व्हावे. अशा कामांची राज्यात गरज असल्याचे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. (Maharashtra)
महापालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, छावणी नगर परिषद, व्हेरॉक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातील विविध विकासकामांचे लोकार्पण ठाकरे यांच्याहस्ते झाले. खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांचे अभिनंदन करतो.
खाम नदीवर वॉकिंग ट्रॅकिंग, जल तलाव, बाल उद्यान, ओपन जिम, व्हॉलीबॉल मैदान, कमल तलाव, सूर्य कुंड, खाम नदी प्रकाश योजना १०० नूतनीकरण केलेल्या पथदिव्यांची स्थापना, योग लॉन, फुलपाखरू उद्यान, ऍम्पिथिएटर आदी प्रकारच्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. निश्चितच शाश्वत विकासाला पूरक अशी ही बाब आहे. खाम नदीचे रूंदीकरण, खोलीकरण करून नदीला पुनरूज्जीवित केले, ही आनंदाची बाब आहे.
जपानमध्येही शहरातून जाणाऱ्या अशाच नदीच्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत असताना, नागरिक भोजन करताना पाहिलेले आहे, अशी आठवण सांगताना औरंगाबादकरही खाम नदीतील या पात्राचा अशाप्रकारे सदुपयोग करतील, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
खाम नदीच्या पुनरूज्जीवन कामात काम करणाऱ्या प्रत्येकांचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. ठाकरे यांच्याहस्ते नदीपात्रात वृक्षारोपनही करण्यात आले, त्यानंतर पात्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. नदी पुनरूज्जीवन कामकाजावर आधारीत ध्वनीचित्रफितही यावेळी दाखविण्यात आली.
तसेच आमखास मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र परिसरातील औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.,च्या मुख्यालय परिसरात मंत्री ठाकरे यांच्याहस्ते इलेक्ट्रीक वाहनांचे लोकार्पण झाले. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये (आयसीसी) इ-गव्हर्नन्स सिस्टीम, स्मार्ट नागरिक मोबाईल ॲप, जीआयएस आणि नागरी सुविधा केंद्रांच्या प्रकल्पाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.