Marathwada Farmers News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात शेतकर्यांनी रस्त्यावर उतरत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादनाची मोजणी बंद पाडण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यातील भूसंपादन मोजणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत परभणीचे खासदार संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या विरोधावर तोडगा काढण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
'कितीही मोबदला दिला, तरी शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही' या भूमिकेवर शेतकरी ठाम होते. महसूल मंत्र्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. शेतकऱ्यांच्या या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून पुन्हा एक व्यापक बैठक घेऊ, अशी भूमिका घेत बावनकुळे यांनी बैठक गुंडाळली.
काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील सहजापूर जवळा व अन्य ठिकाणी गावात शेतकर्यांचे आंदोलन पोलिसांनी बाळाचा वापर करत मोडून काढले होते. यावेळी आंदोलनात सहभागी महिलांवर लाठ्या चालवल्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनीही आंदोलनात सहभाग घेत शेतकर्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर यांच्यासह शेतकर्यांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाची अवस्था आम्ही बघितलेली आहे. आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत. एकीकडे गावात जायला रस्ते नाहीत आणि दुसरीकडे शेतकर्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेऊन शक्तीपीठ महामार्ग तयार केला जात आहे. जर सरकारने या जमिनी ताब्यात घेतल्या तर आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न शेतकर्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.